Varnasi Gyanvapis Report : ‘ज्ञानवापी’ प्रकरणी न्‍यायालयाचा माेठा निर्णय : कोर्ट कमिशनर अजय मिश्रा यांना हटवले

Varnasi Gyanvapis Report :  ‘ज्ञानवापी’ प्रकरणी न्‍यायालयाचा माेठा निर्णय : कोर्ट कमिशनर अजय मिश्रा यांना हटवले

पुढारी ऑनलाईन डेस्‍क

वाराणसी न्‍यायालयात आज ज्ञानवापी प्रकरणी सुनावणी पूर्ण झाली. यावेळी न्‍यायालयाने सर्वेक्षण अहवाल सादर करण्‍यास दोन दिवसांची मुदत दिली. त्‍याचबरोबर कोर्ट कमिशनर अजय मिश्रा यांना हटविण्‍याचे आदेश दिले. मुस्‍लिम पक्षाच्‍या वतीने मिश्रा यांच्‍या भूमिकेवर आक्षेप घेण्‍यात आला होता. ते पक्षपातीपणा करत असल्‍याचा दावा करण्‍यात आला हाेता.

कोर्ट कमिशनर पदावरील व्‍यक्‍तीची जबाबदारी महत्त्‍वपूर्ण असते, असे स्‍पष्‍ट करत न्‍यायालयाने अजय मिश्रा यांना या पदावरुन हटवले. मात्र विशाल सिंह हे कोर्ट कमिशनरपदी कायम राहणार आहेत.

वाराणसीतील ज्ञानवापी संकुलाच्‍या सर्वेक्षणाचा ( Varnasi Gyanvapis Report)  अहवाल सोपविण्‍यासंदर्भात कालावधी वाढवून मिळावा, या मागणीवरील सुनावणी आज पूर्ण झाली. वाराणसी न्‍यायालयाने हा अहवाल सादर करण्‍यासाठी आयाोगाला दाेन दिवसांचा कालावधी दिला. वाराणसीतील ज्ञानवापी संकुलाच्‍या सर्वेक्षणाचा अहवाल आज वाराणसीतील वरिष्‍ठ न्‍यायालयातील न्‍यायाधीश रवि कुमार दिवाकर यांना सादर करायचा होता. हा अहवाल अद्‍याप पूर्ण झालेला नाही. सर्वेक्षणावेळी १५ तासांचे व्‍हिडिओग्राफी झाली. तसेच सुमारे दीड हजार फोटो आहेत. ही माहिती मोठ्या प्रमाणात असल्‍याने त्‍याचे फाईलमध्‍ये रुपांतर झालेले नाही. विशेष ॲडव्‍हकेट कमिशनर विशाल सिंह यांनी अहवाल सादर करण्‍यास कालावधी वाढवून द्‍यावा, असे विनंती पत्र न्‍यायालयास दिले हाेते. न्‍यायालयाने ही विनंती मान्‍य करत सर्वेक्षण अहवाल सादर करण्‍यास दाेन दिवसांचा कालावधी दिला आहे.

मशीद परिसरातील विहिरीत शिवलिंग सापडल्‍याचा दावा सोमवारी करण्‍यात आला होता. हा परिसर सील करण्‍यात यावा, असा आदेश वाराणसी न्‍यायालयाने दिला आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news