श्रीनगर : लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याला अटक | पुढारी

श्रीनगर : लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याला अटक

श्रीनगर, पुढारी ऑनलाईन : जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले. गुप्त माहितीच्या आधारे कुलगाम पोलिस आणि ३४ राष्ट्रीय रायफल्सने दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याला अटक केली आहे. हा दहशतवादी पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या सांगण्यावरून खो-यात कार्यरत होता. यामीन युसूफ भट (रा. गदिहामा) असे अटक केलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे.

पकडलेला ‘हायब्रीड’ दहशतवादी पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा या प्रतिबंधित संघटनेच्या स्थानिक दहशतवाद्यांच्या संपर्कात होता. स्थानिक दहशतवाद्यांनी त्याच्यावर हल्ला करण्याची जबाबदारी सोपवली होती.

हेही वाचा  

वीज संकटावर मात करण्यासाठी परदेशातून कोळसा आणणार : ना.जयंत पाटील

महाराष्ट्राला पुन्हा जाती-पातीच्या बेड्यात अडकवण्याचे काम : रोहित पाटील

दुर्ग दुर्गेश्वर रायगड ते सैनिक गिरगांव ४४ तास नॉन स्टॉप शिवज्योत आणून शिवजयंती साजरी

Back to top button