बेळगाव: चिकोडी लोकसभेसाठी जोरदार बेटिंग; काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

बेळगाव: चिकोडी लोकसभेसाठी जोरदार बेटिंग; काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

चिकोडी: काही दिवसांपूर्वी मतदान झाल्यानंतर आता दि. ४ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले लागले आहे. सर्वच पक्षांचे कार्यकर्ते आपलाच उमेदवार निवडून येणार असल्याचे सांगत आहे. अनेक ठिकाणी यासाठी जोरदार बेटिंग सुरू झाले आहे. आज (दि.१३)  चिकोडीत रस्त्यावर काँग्रेस व भाजप कार्यकर्त्यांच्या चप्पलने हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

नेमका प्रकार काय घडला

  • चिकोडी लोकसभा मतदारसंघात भाजपचे अण्णासाहेब जोले व काँग्रेसचे प्रियांका जारकी होळी यांच्यात लढत
  • ही निवडणूक प्रस्थापित जोल्ले व जारकीहोळी घराण्यांसह भाजप व काँग्रेससाठी प्रतिष्ठेची
  • भाजप व काँग्रेस कार्यकर्त्यांचा आपलाच उमेदवार निवडून येण्याचा दावा
  • चर्चा करीत असताना वादाचे रुपांतर हाणामारीत
  • या  घटनेचा व्हिडिओ चिकोडी शहरासह परिसरात सोशल मीडियावर व्हायरल

चिकोडी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 7 मेरोजी झाली. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार विद्यमान खासदार अण्णासाहेब जोले व काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका जारकी होळी यांच्यात चुरशी लढत झाली. यंदाच्या निवडणुकीसाठी मतदान देखील तीन टक्क्याने वाढीव झाले आहे. ही निवडणूक प्रस्थापित जोल्ले व जारकीहोळी त्या दोन घराण्यांसह भाजप व काँग्रेस पक्षाची प्रतिष्ठेची बनली आहे. मतदानानंतर यंत्रे चिकोडी येथील स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आली आहेत. सर्व उमेदवारांचे भवितव्य यंत्रांमध्ये लॉक झाले आहे. 4 जूनरोजी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पाच-दहा हजारांपासून लाखांपर्यंत बेटिंग

मतदारसंघात सर्वत्र कार्यकर्ते व नागरिकांच्या कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येणार ही एकच चर्चा जोरदार सुरू आहे. पण भाजप व काँग्रेसचे कार्यकर्ते आपलाच उमेदवार निवडून येणार असल्याचे ठासून सांगत आहेत. त्यामुळे चर्चा करीत असताना छोटे छोटे विवाद हमरी तुमरीच्या घटना घडत आहेत. आयपीएल प्रमाणेच आता चिकोडी लोकसभा निवडणुकीच्या निकालासाठी शहरासह ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात बेटिंग लावली जात आहे. यात पाच-दहा हजारांपासून लाख रुपयांपर्यंत कार्यकर्ते व नेते बेटिंग लावत आहेत.

हाणामारीचा व्हिडिओ चिकोडी शहरासह परिसरात व्हायरल

आज चिकोडी शहरातील केकेसी रस्त्यावर नगरपरिषदेच्या शेजारी असलेल्या कर्नाटक वाईन्स या दुकानासमोर चक्क भाजप व काँग्रेसच्या काही ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी आपलाच उमेदवार निवडून येणार असल्याचा दावा केला. त्यामुळे मोठा वाद होऊन चक्क चपलाने हाणामारी झाली. या  घटनेचा व्हिडिओ चिकोडी शहरासह परिसरात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे आज दिवसभर सर्वत्र या कार्यकर्त्यांचीच चर्चा सुरू होती. पुढील चार जून होणाऱ्या मतमोजणी पर्यंत अशा प्रकारचे वाद, बेटिंगचा प्रकार सुरू राहणार आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news