वीज संकटावर मात करण्यासाठी परदेशातून कोळसा आणणार : ना.जयंत पाटील | पुढारी

वीज संकटावर मात करण्यासाठी परदेशातून कोळसा आणणार : ना.जयंत पाटील

इस्लामपूर, पुढारी वृत्तसेवा : वीज संकटावर मात करण्यासाठी परदेशातून कोळसा आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. राज्यात वीज निर्मितीपेक्षा विजेचा वापर प्रचंड असल्याने मोठ्या प्रमाणात वीज तुटवडा जाणवत आहे. तो कमी करण्याचा आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे ना.जयंत पाटील म्‍हणाले.

राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना बहेचे रामलिंग बेट, नरसिंहपूरचे नरसिंह मंदिर व किल्लेमच्छिंद्रगड या पर्यटन स्थळांना भेट देण्यास निमंत्रित केले असून त्यांच्या भेटीनंतर या पर्यटन स्थळांच्या विकासाला अधिक चालना मिळेल,असेही ते म्हणाले.

देशात कोळशाचा तुटवडा असल्याने परदेशातून कोळसा आणण्याचा प्रयत्न आहे. मात्र गेल्या दोन महिन्यात केंद्र व राज्य सरकारच्या समन्वय यातून हे काम व्हायला हवे होते,अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा  

Back to top button