जावेद अख्तर, “निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच ‘हिजाब’सारखे मुद्दे तापवले जातात” | पुढारी

जावेद अख्तर, "निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच 'हिजाब'सारखे मुद्दे तापवले जातात"

पुणे, पुढारी ऑनलाईन : “ज्यांच्याकडे विरोधाला काही कारणे नसतात, ते कोणत्याही गोष्टी भावनेशी जोडल्या जातात. पावसाळा जवळ आला की, बेडकं कशी बाहेर येतात, त्याचप्रमाणे निवडणुका जवळ आल्या की, कर्नाटकातील हिजाब वगैरेसारखे मुद्दे बाहेर काढले जातात. निवडणुका संपल्या की, हे मुद्दे आपोआप संपतात”, अशी टीका जावेद अख्तर यांनी प्रत्येक गोष्टीला विरोध करणाऱ्या लोकांवर केली.

२० व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जावेद अख्तर बोलत होते. ते पुढे म्हणाले की, “आज माणसे भावनिकदृष्ट्या संवेदनशील होत चालली आहे. आयुष्यात काही विधायक न केलेल्याच व्यक्ती विरोधाचा पवित्रा घेतात. काही न करता लोकांच्या धार्मिक भावना लगेच दुखावतात. नैतिक मूल्यांना धक्का लागला तर भावना दुखावल्याचे कधी ऐकवित आहेत का? ज्यांच्याकडे विरोधाला काही कारण नसते ते कोणत्याही गोष्टी भावनेशी जोडतात”, अशा परखड शब्दांत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.

“ओटीटी खूप सशक्त माध्यम आहे. जे बोल्ड विषय चित्रपटात येऊ शकत नाहीत ते ओटीटीवर येऊ शकतात. भाषेमध्ये शिव्यांचा भडिमार असला तरी हे माध्यम येण्यापूर्वी शिव्या दिल्याच जात नव्हत्या का?  समाजातही एका ठिकाणाहून दुसरीकडे जाताना आपल्या कानावर एकही शिवी पडत नाही का? समाजात शिव्या दिल्याच जात नाहीत असं तर होत नाही ना? मी त्याचे समर्थन करीत नाही आणि स्वत:ही कधी शिव्या देत नाही. पण चांगला विषय असेल तर काही वेळा चालवून घ्यायचे किंवा दुर्लक्ष करायचे”, असंही त्यांनी सांगितलं.

हे वाचलंत का? 

Back to top button