Baipan Bhari Deva Movie : ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट ‘या’ दिवशी पुन्हा पाहता येणार | पुढारी

Baipan Bhari Deva Movie : 'बाईपण भारी देवा' चित्रपट 'या' दिवशी पुन्हा पाहता येणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : सुपरहिट चित्रपट बाईपण भारी देवा पहिल्यांदाच स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार आहे. (Baipan Bhari Deva Movie) १९ मे ला सायंकाळी ७ वाजता ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर असेल. बाईपण भारी देवाने २०२३ हे वर्ष चांगलंच गाजवलं. फक्त महिला वर्गच नाही तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकानेच या सिनेमाला भरभरुन प्रेम दिलं. (Baipan Bhari Deva Movie)

रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, सुकन्या मोने आणि दीपा परब या मुख्य भूमिका साकारलेल्या सर्व अभिनेत्रींवर कौतुकाचा वर्षाव झाला. मंगळागौर स्पर्धा जिंकण्यासाठी सहा बहिणींची होणारी तारेवरची कसरत आणि ही कसरत करता करता बहिणींमधलं खुलत जाणारं नातं या चित्रपटाची उत्सुकता शेवटपर्यंत ताणून धरतात.

Back to top button