russia ukraine war : युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांची रशिया करणार सुटका! | पुढारी

russia ukraine war : युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांची रशिया करणार सुटका!

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन डेस्क : रशियाच्या नॅशनल सेंटर फॉर स्टेट डिफेन्स कंट्रोलने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे, की युक्रेनमध्ये ( russia ukraine war ) अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी बसेस चालवल्या जातील. प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, युक्रेनमधील खार्किव आणि सुमी येथे अडकलेल्या भारतीयांसह परदेशी विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी रशियाने बसेस तयार केल्या आहेत. सुमारे 130 बसच्या माध्यामतून भारतीय विद्यार्थी व नागरिकांना बाहेर काढण्यात येणार आहेत. भारत सरकारने अद्याप याची अधिकृत माहिती मिळालेली नाही. सूत्रांकडून अशी माहिती मिळते की, आतापर्यंत रशियाकडून भारत सरकारला याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

युक्रेनने भारतीयांना ठेवले ओलीस ( russia ukraine war )

याच निवेदनात युक्रेनने भारतीय विद्यार्थ्यांना ओलीस ठेवल्याचा आरोपही रशियाने केला आहे. रशियाच्या म्हणण्यानुसार, युक्रेनने सुमारे 3100 भारतीयांना ओलीस ठेवले आहे. त्याचवेळी रशियाने ओलीस ठेवलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याची तयारी केली असून त्यांना बसमधून बाहेर काढण्यात येणार आहे.

नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी ( prime minister narendra modi ) यांनी युक्रेनमध्ये ( russia ukraine war ) अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन ( President of Russia Vladimir Putin ) यांच्याशी चर्चा केली. यावेळी युक्रेनमधून भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्याबाबत चर्चा झाली. पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी युक्रेनमधील परिस्थितीचा आढावा घेतला.

त्याचवेळी, आज केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, युक्रेनमधून आतापर्यंत 17 हजार भारतीयांना बाहेर काढण्यात आले आहे.

 

Back to top button