२०१४ च्या तुलनेत संस्थागत रोजगारात २२ टक्क्यांनी वाढ : केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव | पुढारी

२०१४ च्या तुलनेत संस्थागत रोजगारात २२ टक्क्यांनी वाढ : केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : बेरोजगारीच्या मुद्यावरून विरोधी पक्षांकडून केंद्र सरकार वर सतत टीका होत आहे. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडून याबाबत उत्तर देण्यात आले आहे. देशात संस्थागत क्षेत्रात २२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१३-१४ च्या तुलनेत देशात संस्थागत रोजगारात २२ टक्क्यांना वाढ झाली असल्याचे भुपेंद्र यादव राज्यसभेत बोलताना म्हणाले.

भुपेंद्र यादव यांनी राज्यसभेत प्रश्नोउत्तराच्या काळात विचारल्या गेलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली आहेत. भुपेंद्र यादव यांनी सरकार केलेल्या विविध सर्वेक्षणांचा आधार घेत ही उत्तरे दिली आहेत. कोरोनाची महामारी असतानाही संस्थागत रोजगारात दोन लाखांची वाढ झाली आहे. याच्या व्यतिरिक्त २०१३-१४ पासून संस्थागत क्षेत्रात ३ कोटी ८० लाख रोजगाराच्या संधी उपलब्घ करण्यात सरकार यशस्वी झाल्याचे भुपेद्र यादव यांनी सांगितले.

आमचं सरकार कोणत्या अपेक्षा पूर्ण करू शकले हे जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणाचा अहवाल सप्टेंबर महिन्यात आला आहे. श्रम ब्युरोच्या दुसऱ्या अहवालानुसार कोरोना महामारी असताना देखील भारतात संस्थागत क्षेत्रात रोजगाराची दोन लाखांना वाढ झाली. केंद्रीय मंत्री पुढे बोलताना म्हणाले की ‘ईपीएफओ’ च्या आकडेवारीनुसार हे स्पष्ट झाले आहे की, भारतात रोजगारात वाढ झाली आहे.

हेही वाचलतं का?

Back to top button