शेतीतील ‘या’ बदलामुळे उत्पन्नात होईल वाढ | पुढारी

शेतीतील ‘या’ बदलामुळे उत्पन्नात होईल वाढ

रोहित हेगडे, पुढारी ऑनलाईन डेस्‍क : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. एकाच प्रकारे आणि एकच पीक सातत्‍याने घेतल्‍याने उत्पन्नात वाढ होत नाही व शेतीस ही नुससान होते. काही शेतकर्‍यांनी निर्धार केला तर ते विविध कृषी पद्धतींना आपले उत्पन्न वाढवण्याचे साधन बनवू शकतो. असे कृषी तज्ञांनी सांगितले आहे. नवीन तंत्रज्ञानान वापरून शेतकऱ्यांनी आपल्‍या उत्पादनात वाढ केली पाहिजे. तर काही शेतकरी यामध्ये यशस्‍वी ही झाले आहेत. नवीन तंत्रज्ञानाने शेती करणे हे सायन्स नसून आपल्या जमिनीची सुपीकता ओळखून आणि पीक चक्र बदलून उत्पन्न सहज वाढवता येते.

कसे वाढवाल उत्‍पन्न

सध्या शेतकरी हे पारंपारिक पद्धतीनेच शेती करत आहेत. या अंतर्गत शेतकरी फक्त गहू, हरभरा, मोहरी अशी कडधान्याचे पीक घेतात. तसेच कमी कालावधीत येणारी पीके सतत घेतात. यामूळे उत्‍पन्न ही मर्यादित राहते. तर आता शेतक-यांनी जुनी पद्धत न स्वीकारता आधुनिक पद्धतीने शेती करायला हवी.

  • शेतात ठिबक सिंचन केल्‍याने पाण्याची बचत होवून सर्व शेती ओलीताखाली येते.
  • पारंपरिक पिकांना तिलांजली देत दररोज लागणारी पीके यामध्ये विविध प्रकारचा भाजीपाला घेणे आवश्यक आहे.
  • अर्ध्‍या ते एक एकरावर शेडनेट केल्‍याने त्‍यामध्ये पहिल्‍याच हंगामात काकडी व पालक, मेथी लागवड करावी तर दुस-या हंगामात टमाटर व फुलकोबी अश्या प्रकारच्या भाजीपाला पीकांची लागवड करावी.
  •  शेतातमध्ये सतत एकाच प्रकारचे पीक घेवू नये. हंगामानूसार बदल करून पीके घ्‍यावीत. यामध्ये पांरपरिक पिके घेताना बदलत्‍या निर्सगाच्या लहरीपणामूळे आणि शेतातून कमी उत्‍पन्‍न होवू शकते. परंतु पिकांत बदल आणि शेडनेटमुळे उत्‍पन्नात वाढ होते.
  • नेहमीच्या पिकांबरोबरच टोमॅटो, लसूण, कांदा, मिरची, पालेभाज्‍या, फुले इ. ची शेतात लागवड केली पाहिजे. ही पिके एकत्रितपणे केल्याने त्यांचे उत्पन्नात वाढ होते.
  • एका शेतक-याने 2016-17 मध्ये शेतीतून हेक्टरी 40 ते 50 हजार इतके उत्पन्न मिळाले. आता आधुनिक पदधतीने आणि यंत्राचा वापर करून 2021-22 मध्ये उत्पन्न हे प्रति हेक्टर 1 लाखांपेक्षा ही जास्त घेतले आहे.
  • शेतकऱ्यांनीही नवीन पद्धतीचा वापर करून कृषीतज्ञांशी सल्लामसलत करून चांगले बियाणे निवडून त्याची लागवड करावी. यामुळे उत्पन्नात वाढ होईल. त्यामुळे पारंपरिक शेतीपेक्षा आधुनिक शेती हा फायदेशीर व्यवसाय होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. असे कृषीतज्ञांनी सांगितले आहे.

हे ही वाचलं का  

Back to top button