यवतमाळ : पदयात्रेतील ४० भाविकांना जेवणातून विषबाधा | पुढारी

यवतमाळ : पदयात्रेतील ४० भाविकांना जेवणातून विषबाधा

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा
नाशिक ते जांबोरा पदयात्रेतील ४० भाविकांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना दारव्हा तालुक्यातील चिकणी येथे सोमवारी सायंकाळी घडली. या रुग्णांवर सध्या दारव्हा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नाशिक ते जांबोरा अशी महानुभव पंथांची पदयात्रा निघाली होती. नाशिक येथून पदयात्रा जांबोरा येथे पोहोचली. जांबोरा येथील दत्त मंदिर प्रसिद्ध आहे. त्यानंतर पदयात्रा कामठवाडानजीक असलेल्या चिकणी येथे पोहोचली. यावेळी पदयात्रेतील भाविकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांनी जेवण केल्यानंतर उलट्या आणि संडासचा त्रास सुरू झाला. तब्बल ४० जणांना विषबाधा झाल्याचे लक्षात येताच तातडीने त्यांना दारव्हा येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. सध्या ४० रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. रुग्णांमध्ये महिला व पुरुषांचा समावेश आहे.

हेही वाचा : 

Back to top button