Sinnar Road Concreting Project | सिन्नरचा 'आडवा फाटा' मार्ग चकाचक होणार! 20 कोटींच्या काँक्रिटीकरण कामाला लवकरच सुरुवात

Sinnar Road Concreting Project | पावसाळ्यात पाणी साचण्याचा प्रश्न सुटणार, चौपदरीकरणामुळे वाहतूक कोंडी फुटणार
Road Development
Road DevelopmentPudhari
Published on
Updated on

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा

शहरातील आडवा फाटा ते सिन्नर बायपासवरील सरदवाडी अंडरपासपर्यंतच्या सुमारे दोन किलोमीटर रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी केंद्रीय रस्ते व पायाभूत सुविधा योजनेंतर्गत सुमारे २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. हे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लवकरच सुरू होणार असून, या मार्गावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात साचणाऱ्या पाण्याचा प्रश्नही निकाली निघणार आहे.

Road Development
Ratnagiri Water Quality Report 2026 | चार तालुक्यांतील दहा ठिकाणचे पाणी दूषित

दरम्यान, रस्त्यालगत दोन्ही बाजूला असलेल्या ११० अतिक्रमणधारकांना नोटिसा बजाविण्यात आल्या असून, अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या रस्त्यावर अजिंक्यतारा ते वाजे लॉन्सदरम्यान तसेच मॉडर्न कॉलनी परिसरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्यामुळे वाहनचालक व नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.

या पार्श्वभूमीवर संपूर्ण मार्गावर स्लॅबसह बंदिस्त गटार बांधण्यात येणार आहे. हॉटेल संगत सोबत ते झापवाडी येथील हनुमान मंदिराजवळ उंचवटा असल्याने गटारीची खोली वाढविण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातून येणारे पावसाचे पाणी आडवा फाटा परिसरातील जुन्या नाशिक पुणे महामार्गाजवळील ड्रेनेजमध्ये सोडण्यात येणार असल्यामुळे पाणी साचण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

दरम्यान, सरदवाडी रोडलगत असलेल्या अतिक्रमणधारकांना सार्वजनिक बांधकाम विभाग व नगर परिषदेमार्फत नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. सुमारे ११० अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, अनेकांनी स्वयंस्फूर्तीन पत्र्याचे शेड व अन्य अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली आहे.

संबंधितांनी अतिक्रमण न काढल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग व नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे काही व्यावसायिकांचे धावे दणाणले आहे. खासदार राजाभाऊ वाजे आणि आमदार माणिकराव कोकाटे यांच्या पाठपुराव्यामुळे या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाल्याची माहिती संबंधितांनी दिली. लवकरच काम सुरू होऊन नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या प्रश्नाला दिलासा मिळणार आहे.

Road Development
Malegaon Ramzan Eid Shopping| मालेगावी ईदच्या खरेदीसाठी उसळली गर्दी

११० अतिक्रमणधारकांना बजाविल्या नोटिसा

या मार्गावर वाजे लॉन्स, मॉडर्न कॉलनीकडे जाणारा रस्ता तसेच इतर भागांमध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. कामगारबहुल व वाढती नागरी असलेल्या या भागात वाहतूकही मोठ्या प्रमाणात असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. याच भागात भाजी बाजार असल्याने वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागत असे. रस्ता कामाला मंजुरी मिळाल्याने स्थानिक नागरिकांम ध्ये समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, ११० अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावल्या आहे.

एक मीटर दुभाजक ; १४ मीटर रुंद रस्ता

प्रस्तावित रस्ता दोन्ही बाजूंनी सात-सात मीटर रुंदीचा असून, मध्यभागी एक मीटरचा दुभाजक असणार आहे. गटाराचे बांधकाम १.२ मीटर बाय १.२ मीटर आकाराचे करण्यात येणार आहे. या मार्गावरील विद्युत खांबांच्या स्थलांतरासाठी महावितरण कंपनीने जिल्हाधिकाऱ्यांकडे सुमारे सव्वा कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर रस्त्यालगतचे विद्युत खांब स्थलांतरित करण्यात येणार आहेत.

रस्त्याच्या मध्यभागापासून दोन्ही बाजूंना १०-१० मीटर जागा मोकळी करून त्यानंतर सात-सात मीटरचा फोरलेन रस्ता तयार करण्यात येणार आहे. अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावल्या असून, तीन दिवसांत अतिक्रमण काढण्याची मुदत दिली आहे.

अविनाश देवरे, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, सिन्नर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news