Nashik Crime: नाशिक हादरलं! स्वयंघोषित ‘कॅप्टन’वर बलात्काराचा गुन्हा; सेलिब्रिटींशी कनेक्शन, ५८ व्हिडिओ जप्त

Nashik Crime Ashok Kharat: नाशिकमध्ये बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी अशोक खरात उर्फ ‘कॅप्टन’ याला क्राइम ब्रांचने अटक केली आहे. तपासादरम्यान आरोपीकडून ५८ व्हिडिओ जप्त करण्यात आले आहेत.
Nashik Crime Ashok Kharat Arrested
Nashik Crime Ashok Kharat ArrestedPudhari
Published on
Updated on

Nashik Crime Ashok Kharat Arrested: नाशिकमध्ये बलात्कार प्रकरणामुळे खळबळ उडवली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अशोक खरात उर्फ ‘स्वयंघोषित कॅप्टन’ याला क्राइम ब्रांचने अटक केली आहे. आरोपीविरुद्ध बलात्काराचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

तपासादरम्यान पोलिसांना मोठे धागेदोरे मिळाले आहेत. आरोपीकडे असणारे तब्बल ५८ व्हिडिओ जप्त करण्यात आले आहेत. या व्हिडिओंमध्ये काही नामांकित महिला आणि सेलिब्रिटींची नावे असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य आणखी वाढलं असून तपास यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. जप्त करण्यात आलेल्या व्हिडिओंची सध्या बारकाईने तपासणी केली जात आहे. या तपासातून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Nashik Crime Ashok Kharat Arrested
Nashik MHADA Housing Scam 2026 | म्हाडा घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता

कोण आहे अशोक खरात?

अशोक खरात उर्फ ‘कॅप्टन’ हा नाशिक परिसरातील व्यक्ती आहे. तो पूर्वी मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन म्हणून कार्यरत होता. निवृत्तीनंतर त्याने ज्योतिष आणि अंकशास्त्राचा अभ्यास सुरू केला आणि त्याच्या माध्यमातून लोकांना मार्गदर्शन करत होता. मिरगाव येथील ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा तो प्रमुख असल्याचीही माहिती आहे.

खरात हा अंकशास्त्र आणि ज्योतिषाच्या आधारे लोकांच्या समस्या सोडवतो, असं सांगत असे. विशेष म्हणजे, तो कलाकार आणि राजकीय नेत्यांचं भविष्य सांगतो आणि त्यांना मार्गदर्शन करतो, अशी त्याची प्रतिमा तयार झाली होती. त्यामुळे अनेक लोक त्याच्याकडे सल्ल्यासाठी येत होते.

Nashik Crime Ashok Kharat Arrested
Who Is Menaka Guruswamy: कोण आहेत भारताच्या पहिल्या LGBTQ+ खासदार मेनका गुरुस्वामी? जाणून घ्या त्यांचा प्रवास

मात्र आता या सर्व गोष्टींच्या आड गंभीर गुन्हे होत असल्याचा संशय निर्माण झाला आहे. अशोक खरातवर एका बाजूला बलात्काराचा गंभीर आरोप आहे, तर दुसरीकडे काही नामांकित महिलांशी संबंधित कथित व्हिडिओ सापडल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास अत्यंत संवेदनशीलतेने करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news