

Nandgaon Sexual Assault Case
नांदगाव: तालुक्यातील जातेगाव येथील एका अल्पवयीन १२ वर्षाच्या मुलीवर सावत्र बापानेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात सावत्र बापा विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.माणुसकीला काळिमा असणाऱ्या या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, येथील बोरसे वस्ती येथील लक्ष्मण रघुनाथ बोरसे या नराधमाने आपल्या बारा वर्ष सहा महिन्याच्या सावत्र मुलीवर एप्रिल ते आक्टोबर २०२५ या कालावधीत आपल्या राहत्या घरात आणि बाजूलाच असलेल्या जंगलात नेऊन जबरदस्तीने अत्याचार केला.
या घटनेची वाच्यता फुटल्यानंतर दि.१४ मार्चरोजी नांदगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी लक्ष्मण रघुनाथ बोरसे याला नांदगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
घटनेची माहिती मिळताच मनमाड चे उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन, पोलिस निरीक्षक दिगंबर भदाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे यांनी घटनास्थळी भेट देवून पाहाणी केली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिगंबर भदाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे, पोलिस हवालदार भास्कर बस्ते, परमेश्वर श्रीखंडे अधिक तपास करत आहेत.