…तर होऊ शकतो मोठा संघर्ष: डॉ. बबनराव तायवडे | पुढारी

...तर होऊ शकतो मोठा संघर्ष: डॉ. बबनराव तायवडे

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : गाव बंदीच्या माध्यमातून प्रश्न निकाली निघू शकत नाही. लोकप्रतिनिधी सोबत संवाद होणे गरजेचे आहे. मात्र, तो त्यांचा निर्णय आहे. केंद्र सरकारने 50 % ची मर्यादा शिथिल करावी. अध्यादेश काढावा हाच यावर पर्याय आहे. त्याकरता जातनिहाय जनगणना आवश्यक आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केले आहे.

तायवाडे म्हणाले की, मराठा आंदोलनकर्ते राज्यात आक्रमक होत आहेत. यवतमाळला बस जाळली याचा नक्कीच निषेध आहे. मनोज जरांगे पाटील लोकांना वारंवार निवेदन करताहेत की, शांततेत आंदोलन करा. माझेही आंदोलनकर्त्यांना निवेदन आहे की, जरांगे- पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे शांततेत आंदोलन करा. सामान्य माणसांची हानी होईल, असे कोणतेही कृत्य करू नका. सामान्य माणसाच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर सामान्य माणसाकडूनही प्रतिक्रिया येऊ शकतात. त्यामुळे मोठा संघर्ष निर्माण होऊ शकतो, अशी भीती तायवाडे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा 

Back to top button