नांदेड : पैनगंगा नदीवरील पुलाजवळ अज्ञातांनी नागपूर-नांदेड बस जाळली | पुढारी

नांदेड : पैनगंगा नदीवरील पुलाजवळ अज्ञातांनी नागपूर-नांदेड बस जाळली

उमरखेड, पुढारी वृत्‍तसेवा उमरखेड तालुक्यात अज्ञात तरूणांनी राज्य परिवह विभागाची बस पेट्रोल ओतून जाळल्याने खळबळ उडाली. ही घटना (शुक्रवार) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास उमरखेड तालुक्यातील गोजेगाव नजीकच्या पैनगंगा पुलावर घडली. दरम्‍यान बसमधील ७३ प्रवासी सुखरूप आहेत.

नांदेड आगाराची नांदेड-नागपूर बस रात्री ११ वाजता पैनगंगा पुलाजवळ पोहोचताच मागून आलेल्या एका मोटारसायकल स्वाराने ही बस थांबवली. त्याच्यामागून परत पाच ते सहा लोक आले. त्यांनी बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरविले. त्यानंतर या अज्ञात लोकांनी पेट्रोल टाकून बस पेटवून दिली.

या घटनेत बस (क्र. एमएच २०- जीसी ३१८९) चे ३२ लाख रुपयांचे नुकसान झाले. बस जाळणारे कोण होते, त्यांनी हा प्रकार का केला, याचा शोध उमरखेड पोलिस घेत आहेत. या बसवर चालक बी.डी. नाईकवाडे, तर वाहक एस.एन. वाघमारे हे होते. घटनास्थळी यवतमाळ आणि नांदेड एसटी विभाग नियंत्रकांसह पोलिसांनी भेट दिली. या प्रकरणी अद्याप कोणत्याही आरोपीची ओळख पटली नाही. हा प्रकार मराठा आंदोलनाच्या अनुषंगाने घडला की यामागे अन्य काही कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा :

Back to top button