नागपूर : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून  | पुढारी

नागपूर : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून 

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : आपल्या पत्नीचे कुणाशी तरी विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून पतीने डोक्यावर लोखंडी पाईप मारून तिची  हत्या केली. ही घटना दसऱ्याच्या दिवशी अर्थात मंगळवारी रात्री आठ वाजता सक्करदरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शितलामाता चौक परिसरात घडली.
अनुसया ऊर्फ दिव्या गजाम (वय २४) असे मृतक नवविवाहितेचे  तर श्यामकिशोर तेजलाल गजाम (वय २७) रा. भजियापार, जडखरोद, कटेरा ता. कटंगी जि. बालाघाट म.प्र. असे आरोपी पतीचे नाव आहे. काही महिन्यांपूर्वीच आरोपी श्यामकिशोर आणि मृतक दिव्याचा विवाह झाला. लग्नानंतर दिव्या ही कुण्यातरी नातेवाईकाशी वारंवार संपर्कात होती. श्यामकिशोरने तिला त्या युवकाशी न बोलण्याची तंबी दिली.मध्यप्रदेशमध्ये हाताला काम नसल्याने तो बेरोजगार होता. १० दिवसांपूर्वीच कामाच्या शोधात श्यामकिशोर हा पत्नीला घेऊन नागपुरात आला. सक्करदरा परिसरातील ईपीएफ कार्यालयाच्या शासकीय निवासस्थानात तो पत्नीसह राहत होता. मात्र, पत्नी फोनवरून कुणाशीतरी बोलत असल्यामुळे त्याला पत्नीच्या चारित्र्यावर संशय आल. रात्री या वादाचे पडसाद थेट जिवघेण्यापर्यंत पोहचले. श्यामकिशोरने लोखंडी पाईपने पत्नीच्या डोक्यावर हल्ला केला. पत्नी रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर तो घरातून पसार झाला. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. सक्करदरा पोलिसांनी श्यामकिशोरवर खुनाचा गु्न्हा दाखल करून त्याचा शोध सुरु केला आहे.

Back to top button