चंद्रपूर : नाना पटोले-विजय वडेट्टीवार यांची केंद्र आणि राज्य सरकारवर टीका | पुढारी

चंद्रपूर : नाना पटोले-विजय वडेट्टीवार यांची केंद्र आणि राज्य सरकारवर टीका

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : नाना पटोले-विजय वडेट्टीवार यांची केंद्र आणि राज्य सरकारवर टीका इंग्रजांना हाकलून लावण्याकरीता काँग्रेसने लढाई लढली. आता केंद्रात व राज्यात इंग्रज विचारसरणीचे सरकार आहे. या सरकारांना हाकलून लावण्याकरीता चिमूरातील जनतेने क्रांतीभूमितून क्रांतीची मशाल पेटवावी, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

आज शनिवारी (दि.१६) चिमूरात डॉ. सतिश वारजुकर यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस कार्यकर्ता मेळावा व सत्कार समारंभ पार पडला. काँग्रेस कार्यकर्ता मेळावा व सत्कार कार्यक्रमाचे निमित्याने विरोधी पक्षनेते वड्डेटीवार व प्रदेशाध्यक्ष पटोले दोन्ही नेते एकाच मंचावर आले होते. यावेळी ते बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले तर उद्घाटक म्हणून विरोधी पक्षनेते तथा आ.विजय वडेट्टीवार यांची उपस्थित होते. प्रमख अतिथी म्हणून माजी आमदार डॉ.अविनाश वारजूकर, आमदार अभिजित वंजारी, आमदार अडबाले, बाळ कुलकर्णी, प्रवक्ते अतुल लोंढे, माजी आमदार नामदेव उसेंडी, माजी आमदार आनंद गेडाम, सतीश वारजुकर, नामदेव किरसाण, नितीन कोडवते, महिंद्र ब्राम्हणवाडे यांची उपस्थिती होती.

पटोले पुढे म्हणाले, गोरगरिबांना मारण्याची व्यस्था मनुवाद्यांनी करून ठेवली आहे. गोरगरिबांना पुन्हा गरीब आणि मुठभर लोकांना श्रीमंत करून गरीबांना गुलाम करण्याचे काम देशातील केंद्र सरकार करीत आहे. देशात जे राजकरण सुरू आहे, त्या विरोधात आपल्याला मुठ बांधण्याची गरज आहे.

जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून गावागावातील लोकांच्या भावना जाणून घेतल्या. काँग्रेसला जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जनतेच्या विरोधात निर्णय घेणाऱ्या सरकारबद्दल जनतेत प्रचंड संताप आहे. त्यामुळे जनतेला पुन्हा काँग्रसेला सत्तेत आणायचे आहे.

यावेळी वडेट्टीवारांनी भाजपवर सडकून टीका केली. ‘भाजपने गडचिरोली चिमुर लोकसभा मतदारसंघ वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे. येथील खासदार केवळ बॅनरवर झळकताना दिसतात. त्यामुळे लोकसभा, विधानसभा निवडणुकात भाजपला धडा शिकवून क्रांतीभूमीतून परिवर्तनाची नांदी करा,’ असे आवाहन केले.

गडचिरोली चिमुर येथे काँग्रेसचा विजय निश्चित झाल्याचा विश्वासही वडेट्टीवारांनी व्यक्त केला. ‘ मराठवाड्यात दुष्काळ घोषित करण्याचे पाऊल सरकारने अद्याप उचललेले नाही. सरकार सरसकट कर्जमुक्तीची घोषणा करेल असे वाटत होते. मात्र शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी सरकार मराठवाड्यात गेले काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा :

Back to top button