Prahar Jan Shakti Party: शिव- भीम मॅरेथॉनला अमरावतीकरांचा उदंड प्रतिसाद | पुढारी

Prahar Jan Shakti Party: शिव- भीम मॅरेथॉनला अमरावतीकरांचा उदंड प्रतिसाद

अमरावती: पुढारी वृत्तसेवा : अमरावती महानगर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त जिल्हा स्तरीय शिव – भीम मॅरेथॉन दौड स्पर्धा सोमवारी (दि.१९) पार पडली. जिल्हा अॅथलेटिक असोसिएशन अंतर्गत झालेल्या या मॅरेथॉन स्पर्धेत सुमारे ५३६ नागरिकांनी सहभाग नोंदविला. आबाल वृद्ध देखील या स्पर्धेत सहभागी होते. सकाळी ६ वाजता शिव टेकडी येथून सुरू झालेल्या या स्पर्धेला प्रहार चे संस्थापक आमदार बच्चू कडू यांच्यासह पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी हिरवी झेंडी दाखविली. आमदार बच्चू कडू यांनी हाती मशाल घेत स्पर्धकांचा उत्साह वाढविला. Prahar Jan Shakti Party

या स्पर्धेत प्रणाली शेगोकार, सलोनी लव्हाळे,दीपा उईके, गायत्री डांगे,आरती भोयरे,पायल मगरदे तर मुलांमध्ये सौरभ तिवारी छगन बोंबले प्रशिक थेटे, संजय पटेल, राकेश बेठे, मुकेश धनगर यांनी विजय मिळवला. Prahar Jan Shakti Party

यावेळी आमदार बच्चू कडू, पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, प्रमुख जिल्हाध्यक्ष छोटू महाराज वसू , अमरावती जिल्हा अथलेटिक असोसिएशनचे उत्तमचंद ठाकुर, नबील कुरेशी, अतुल पाटील, चेतक शेंडे, विक्की खत्री, प्रकाश उडवानी, रावसाहेब गोंडाणे, प्रहार महानगर प्रमुख बंटी रामटेके आदी उपस्थित होते.

Prahar Jan Shakti Party : धर्मनिरपेक्ष लोकशाहीसाठी दौड: बच्चू कडू

छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांची आज गरज आहे. शिवाजी महाराज यांनी रयतेचे राज्य निर्माण केले. शिव – भीम मॅरेथॉन स्पर्धा ही अशीच आगळी वेगळी स्पर्धा आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून जनतेला एकता, अखंडतेचा संदेश गेला आहे. आजच्या परिस्थितीत जाती धर्माच्या राजकारणात सर्वधर्मसमभाव ही भावना पूर्णतः विसरून गेली आहे. त्यामुळे आज शिव – भीम यांचे आचार विचार समाजापर्यंत पोहचविण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. धर्मनिरपेक्ष लोकशाही वाचविण्यासाठी ही दौड- मॅरेथॉन स्पर्धा आहे, जी देशात एकता आणि अखंडता कायम करेल. आज रयतेला वाचविण्यासाठीच ही दौड आहे, असे प्रतिपादन आमदार बच्चू कडू यांनी केले.

हेही वाचा 

Back to top button