Amravati Accident News : अमरावती-यवतमाळ मार्गावर बस-ट्रकच्या धडकेत ४ खेळाडू ठार, १० जण गंभीर जखमी | पुढारी

Amravati Accident News : अमरावती-यवतमाळ मार्गावर बस-ट्रकच्या धडकेत ४ खेळाडू ठार, १० जण गंभीर जखमी

अमरावती, पुढारी वृत्तसेवा:  क्रिकेट खेळायला जाताना १४ तरुणांचा भीषण अपघात झाल्याची घटना आज (दि.१८) अमरावती जिल्ह्यात घडली आहे. जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर-यवतमाळ मार्गावर मिनी बस आणि काँक्रिट मिक्सर ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ४ तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य १० जण गंभीर जखमी झाले आहेत. Amravati Accident News

अमरावती येथील १४ तरुण यवतमाळ येथे क्रिकेट खेळायला जात होते. दरम्यान मिनी बस आणि सिमेंट मिक्सर ट्रकमध्ये भीषण धडक झाली. रविवारी सकाळी ७.३० च्या सुमारास नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिंगणापूर जवळ हा अपघात झाला. यात ४ तरुणांचा मृत्यू झाला असून १० जण गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये शहरातील रवीनगर आणि रुक्मिणी नगरातील तरुणांचा समावेश आहे. गंभीर असलेल्यांना अमरावती येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. Amravati Accident News
क्रिकेट मॅच खेळण्यासाठी हे सर्व १४ तरुण अमरावती येथून यवतमाळसाठी सकाळी निघाले होते. मात्र वाटेतच नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिंगणापूरजवळ हा भीषण अपघात झाला. अपघातातील जखमी तरुणांना नांदगाव खंडेश्वर येथील तालुका आरोग्य केंद्र येथे प्राथमिक उपचारासाठी दाखल केले होते. त्यांनतर आता या सर्व जखमींना उपचारासाठी अमरावती शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती जखमी व मृतांच्या नातेवाईकांना मिळतात त्यांनी रुग्णालयात एकच गर्दी केली होती.

हेही वाचा 

Back to top button