Anganwadi worker movement : काळे कपडे परिधान करून अंगणवाडी सेविकांचे आंदोलन | पुढारी

Anganwadi worker movement : काळे कपडे परिधान करून अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

नागपूर : पुढारी वृत्तसेवा : अंगणवाडी सेविकांचे मागील काही दिवसांपासून विविध मागण्यांसाठी नागपूरच्या संविधान चौकामध्ये आंदोलन सुरू आहे. राज्यव्यापी आंदोलन सुरू असूनही सरकार कोणतेही सकारात्मक पाऊल उचलत नाही, अशी आंदोलकांची संतप्त भूमिका आहे. अंगणवाडी सेविकांचे आज अनोखे आंदोलन असून यावेळी सर्वजण काळे कपडे आणि हातात बांगड्या घेत संविधान चौक येथे एकवटले आहेत. ( Anganwadi worker movement )

संबंधित बातम्या 

अंगणवाडी सेविकांचे आंदोलनात यावेळी मोठ्या संख्येने अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरु राहील’, अशी आंदोलकांची अंगणवाडी सेविकांची भूमिका ठाम असल्याचे चित्र आहे. ( Anganwadi worker movement )

Back to top button