Nagpur News: नागपुरात ऑक्टोबरचे 31 पैकी 21 दिवस प्रदूषणाचे ! | पुढारी

Nagpur News: नागपुरात ऑक्टोबरचे 31 पैकी 21 दिवस प्रदूषणाचे !

नागपूर; पुढारी वृत्तसेवा: मागील काही वर्षांत प्रदूषणात अग्रेसर असलेल्या चंद्रपूरपेक्षाही आता राज्याची उपराजधानी नागपूरचे प्रदूषण वाढले असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारी वरून लक्षात येते. ऑक्टोबरचे 31 पैकी 21 दिवस प्रदूषणाचे असल्याचे ही आकडेवारी सांगत असल्याने दिवाळीत फटाक्यांच्या दिवसात तर अधिकच काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. (Nagpur News)
वाहनांची वाढती संख्या ,त्यातून निघनारा धूर ,धूळ , रस्त्यावरील धूळ,कचरा ज्वलन ,बांधकाम आणि थर्मल पॉवर स्टेशन ,इतर उद्योग आदी विविध कारणांमुळे अलिकडे  उपराजधानीसह अनेक जिल्ह्यात प्रदूषणात  मोठी वाढ झाली असून आरोग्याच्या नवनवीन समस्या निर्माण झाल्या आहेत. (Nagpur News)
नागपूरसहित प्रत्येक शहरात अलिकडे विकासासाठी विविध बांधकाम, रस्ते बांधणे सुरू असते त्यातच वाहनाच्या संख्येत वाढ झाली  आहे. मोठ्या प्रमाणावर धूळ आणि धूर बाहेर पडते.नागपूर शहरात प्रदूषणात सतत वाढ होत असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीवरून लक्षात येते. ऑक्टोबर महिन्यात थंडीमुळे धूळ आणि धूर जमिनीजवळ येतो,त्यामूळे शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक(AQI)वाढतो. (Nagpur News)
ऑक्टोबर 2023 महिन्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोंद केलेल्या आकडेवारी नुसार 31 पैकी 21 दिवस असे प्रदूषण आढळले. 0-50 निर्देशांक चांगला मानल्या जातो. हा निर्देशांक इथे केवळ एक दिवस होता. परंतु 51-100 निर्देशांक समाधानकारक किंवा साधारण प्रदूषित मानला जातो.असे 9 दिवस होते. नागपूरमध्ये मात्र ह्यापेक्षा जास्त प्रदूषण आढळले. (Nagpur News)
मागील महिन्यात 31 पैकी 19 दिवस निर्देशांक 100-200 प्रदूषित श्रेणीत होता तर 2 दिवस निर्देशांक 200-300 असा अति प्रदूषित श्रेणीत होता. या प्रदूषणामुळे आधीच श्वसनाच्या रोग्याला त्रास  तसेच नव्याने श्वसनाचे रोग वाढू शकतात. अर्थातच  हे प्रदूषण नियंत्रित ठेवण्यासाठी वृक्षसंख्येत वाढ करणे,शहरात सायकलचा उपयोग वाढविणे, वाहनांच्या संख्येत घट करणे, कचरा न जाळणे, उदयोगांमार्फत प्रदूषण रोखणे , नागरिकांनी सुद्धा प्रदूषण होऊ नये अशा काही उपाययोजना राबविण्यात आल्या तरच प्रदूषणावर नियंत्रण होऊ शकेल असे स्पष्ट मत पर्यावरण अभ्यासक  प्रा सुरेश चोपणे यांनी यानिमित्ताने व्यक्त केले आहे.

हेही वाचा:

Back to top button