Maratha reservation protest
Latest
Maratha reservation protest: मराठा समाज आक्रमक, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या निवासस्थानी बंदोबस्त वाढवला
नागपूर; पुढारी वृत्तसेवा: सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी शहर,गावोगावी साखळी उपोषण सुरू आहे. आमरण उपोषण, हिंसक आंदोलनसुद्धा सुरु आहे. या सर्व पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील धरमपेठ, त्रिकोणी पार्क समोरील खासगी निवासस्थानी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. (Maratha reservation protest)
राज्यात अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसात मराठा समाजाचे लोकप्रतिनिनिधी आक्रमक झाले आहेत. मराठा समाजातील कार्यकर्त्यांकडून सत्ताधारी नेत्यांच्या घरांवर मराठा आंदोलक, अज्ञात व्यक्ती धडक देत आहे. काही प्रसंगी ते तोडफोड करत टोकाचे पाऊल देखील उचलत आहेत. नागपुरातही सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण, कँडल मार्च आणि आज मुंडन आंदोलन करण्यात येत आहे. (Maratha reservation protest)
दरम्यान शासन, प्रशासन खबरदारी घेत आहे. मराठा समाज बांधवांनी गटतट, पक्ष तात्पुरता बाजूला ठेऊन फक्त आणि फक्त मराठा आरक्षणाकरिता मनोज जरांगे-पाटील यांच्या लढ्याला समर्थन देण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन सकल मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे. (Maratha reservation protest)

