Maratha Reservation : लकडी पूल येथे सकल मराठा समाजाचे साखळी उपोषण | पुढारी

Maratha Reservation : लकडी पूल येथे सकल मराठा समाजाचे साखळी उपोषण

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज नवी- सदाशिव पेठ कडून पुणे येथे एक दिवसीय साखळी उपोषण करण्यात आले. सरकारने मराठा समाजाला दिलेले 40 दिवसाचे आश्वासन पाळले नाही म्हणून मा. मनोज जारंगे पाटील पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेले आहेत.

आज त्यांचा नऊ वा दिवस आहे त्यांना पाठिंबा म्हणून नवी- सदाशिव पेठ मराठा क्रांती मोर्चा तर्फे लकडी पुल अलका चौक येथे एक दिवसीय उपोषण करून माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत व पोलीस (गृहविभाग) यांच्या मार्फत महाराष्ट्र सरकारला निवेदन देण्यात आले.

यावेळी मराठा आरक्षण अभ्यासक राजेंद्र कोंढरे, आमदार रविंद्र धंगेकर यांनी मार्गदर्शन केले. उपोषणाचे नियोजन युवराज दिसले, यश काळभोर, मीलन पवार, राजु नाणेकर, आदित्य दळवी, अभिजीत हत्ते, दिपक पोकळे, डॉ मदन कोठुळे, अनंता गांजवे, अप्पा जाधव, राजेंद्र बलकवडे, नंदकुमार जाधव, रविंद्र पठारे आदी उपस्थित होते.

हेही वाचा

National Sports Games : महाराष्ट्राच्या दत्तू भोकनळला नौकानयनमध्ये रौप्यपदक

Pune News : ‘निरा-भीमा’चे 6 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

Maratha Reservation Metting| मराठा आरक्षणाबाबतच्या सर्वपक्षीय बैठकीत नेमकं काय ठरलं?

 

Back to top button