Sambhajiraje Chhatrapati: मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठकीवर संभाजीराजे छत्रपती यांचा बहिष्कार | पुढारी

Sambhajiraje Chhatrapati: मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठकीवर संभाजीराजे छत्रपती यांचा बहिष्कार

मुंबई, पुढारी वृत्तसेवा: मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात आज (दि.१) राज्य सरकारच्या वतीने मराठा आरक्षण या विषयावर सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीस छत्रपती संभाजीराजे अनुपस्थित राहिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूला लावलेली त्यांची खुर्ची ही रिकामीच ठेवलेली पाहायला मिळाली. Sambhajiraje Chhatrapati

मराठा आरक्षण विषयक कोणतीही बैठक कधीही न टाळणारे छत्रपती संभाजीराजे आज प्रथमच अशा बैठकीस अनुपस्थित राहिल्याने चर्चेचा विषय ठरला होता. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली असून त्यांनी या बैठकीस पोकळ बैठक असे संबोधत राज्य सरकारसह सर्वपक्षीयांवर देखील मराठा आरक्षण पेक्षा प्रत्येकाला आपापली व्होट बँक सांभाळणे महत्त्वाचे वाटत असल्याचे टीकास्त्र सोडले आहे. Sambhajiraje Chhatrapati

हेही वाचा 

Back to top button