BJP On Sharad Pawar : शरद पवारांनी आत्मपरीक्षण करावे : भाजपचे प्रत्युत्तर | पुढारी

BJP On Sharad Pawar : शरद पवारांनी आत्मपरीक्षण करावे : भाजपचे प्रत्युत्तर

नागपूर: पुढारी वृत्तसेवा: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आत्मपरीक्षण करावे, असा सबुरीचा सल्ला भाजपने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर केलेल्या टीकेवर दिला आहे.  (BJP On Sharad Pawar)

“शरद पवार साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राजकारणात आले तेव्हापासून एकाच पक्षात आहेत. त्यांची नाळ भाजपाशी जोडलेली आहे. त्यांनी कधीही पक्ष बदलला नाही, विचार बदलला नाही. (BJP On Sharad Pawar)

काही लोकांनी राजकारणात आल्यापासून किती पक्ष बदलले आणि किती वेळा विचार बदलले हे मोजताही येणार नाहीत. स्वतःच्या स्वार्थासाठी गुरुच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या व्यक्तीनं पक्षनिष्ठ आणि प्रामाणिक माणसाबद्दल फार बोलू नये. ज्या काँग्रेसने तुम्हाला पक्ष विरोधी कारवायांसाठी पक्षातून काढले. त्याच काँग्रेससोबत तुम्ही पुन्हा युती केली. ही कृती तुमच्या कोणत्या स्वाभिमानात बसते? पवार साहेब तुमच्या याच खोट्या आणि दलबदलू प्रवृत्तीमुळे तुमचा संपूर्ण पक्ष फुटला. जीवाभावाची माणसं सोडून गेली. ती का गेलीत? तुम्ही कधी आत्मपरीक्षण करणार आहात की नाही? असेही भाजपने म्हटले आहे.

हेही वाचा 

Back to top button