बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्षपदी ज्येष्ठ विधिज्ञ एस. एन. जगताप यांची निवड करण्यात आली. पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश खोमणे या वेळी उपस्थित होते. यानिमिताने बारामतीत शरद पवार गटाने मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून, आगामी काळात पवार विरुध्द पवार असा जोरदार सामना रंगण्याची चिन्हे आहेत.
बारामतीतील सर्व संस्था अजित पवार यांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे शरद पवार गटाला होम ग्राऊंडवर पाय रोवणे मुश्कील झाले होते. परंतु आता काही कालावधी लोटल्यानंतर प्रमुख नेते आपली भूमिका जाहीर करू लागले आहेत. शरद पवार गटाकडून लवकरच बारामती शहरात पक्ष कार्यालय सुरू केले जाणार आहे. याशिवाय पक्षाचे शहराध्यक्ष व अन्य निवडी लवकरच केल्या जाणार आहेत. या गटात कोण कोण जाते याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा :