नागपूर: मुलभूत सोयीसुविधा पुरविण्यावर भर: आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी | पुढारी

नागपूर: मुलभूत सोयीसुविधा पुरविण्यावर भर: आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी

नागपूर: पुढारी वृत्तसेवा :  नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासोबतच मुलभूत सोयीसुविधा पुरविण्यावर आपला भर असेल, अशी ग्वाही नागपूर महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि मावळते नागपूर स्मार्ट सिटी सीईओ व मनपा अतिरिक्त आयुक्त अजय गुल्हाने यांनी आयुक्त कक्षात डॉ. अभिजीत चौधरी यांचे पुष्पगुच्छ देउन स्वागत केले. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी डॉ. चौधरी यांच्याकडे मनपा आयुक्त तथा प्रशासकपदाचा पदभार सुपूर्द केला.

याप्रसंगी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले की, नागपूर शहर हे ‘स्मार्ट सिटी’च्या गणनेतील प्रमुख शहर आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना नाविन्यपूर्ण, दर्जेदार सोयीसुविधा पुरविण्याचा प्रयत्न असणार आहे. स्वच्छ, सुंदर, आणि स्वस्थ नागपूर साकारण्यासाठी प्रत्यत्नशील असणार आहे.

देशाच्या केंद्रस्थानी असलेले नागपूर हे राज्याच्या उपराजधानीचे शहर आहेच शिवाय राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्र्यांचे देखील हे आवडते शहर आहे. नाविन्यपूर्ण कल्पना, सर्वसामान्य नागरिक, लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा सन्मान करण्यात येईल. यापूर्वी छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापुर महानगरपालिका आयुक्त म्हणून त्यांनी पदभार सांभाळला आहे. भंडारा आणि सांगली जिल्हाधिकारी पदावर सुध्दा काम केले . डॉ. अभिजीत चौधरी यांनी पदभार स्वीकारल्या नंतर मनपातील अधिका-यांशी संवाद साधला.

हेही वाचा 

Back to top button