नागपूर: भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदलाचे वारे; शहर, जिल्हाध्यक्ष बदलणार? | पुढारी

नागपूर: भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदलाचे वारे; शहर, जिल्हाध्यक्ष बदलणार?

नागपूर: पुढारी वृत्तसेवा: आगामी काळात लोकसभा, विधानसभा आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लागणार असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोठ्या प्रमाणात संघटनात्मक फेरबदल हाती घेतले आहेत. पक्षाने निवडणूक प्रभारी नेमल्यावर आता जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या सुरु आहेत. नागपूर शहर व नागपूर ग्रामीण जबाबदारी नेमकी कोणाला मिळणार? पदाधिकारी बदलणार की कायम राहणार? असे प्रश्न भाजपच्या वर्तुळात आहेत.

नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष अरविंद गजभिये आणि शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. अलिकडेच या दोन्ही नेत्यांना रामटेक आणि नागपूर लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडील अध्यक्षपदाच्या जबाबदाऱ्या काढल्या जाणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. निवडणूक समोर असताना नागपूर शहराचे अध्यक्ष प्रवीण दटके यांना बदलणार की कायम ठेवणार, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. पक्षाने नागपूर ग्रामीणमधील सावनेर व काटोल विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यादृष्टीने नागपूर ग्रामीणची जबाबदारी दिली जाणार असल्याची भाजपच्या वर्तुळात चर्चा आहे. येत्या आठवडाभरात या नियुक्त्या होतील, असे संकेत भाजपमधून मिळत आहेत.

हेही वाचा 

Back to top button