बुलढाणा: समृद्धी महामार्गावर भरधाव ट्रकने तिघांना चिरडले | पुढारी

बुलढाणा: समृद्धी महामार्गावर भरधाव ट्रकने तिघांना चिरडले

बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा: समृद्धी महामार्गावर लघूशंकेसाठी थांबलेल्या तिघांना एका भरधाव ट्रकने चिरडल्याने तिघेही ठार झाल्याची घटना आज (दि.४) पहाटे चारच्या सुमारास देऊळगाव कोळ शिवारात घडली. ओम विजय मांटे (वय २०), विजय शेषराव मांटे (वय ४८), तुषार गजानन मांटे (वय ३४, सर्व रा. दिग्रस ता. देऊळगाव राजा) अशी मृतांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, देऊळगावराजा येथील पोलीस कान्स्टेबल सुरेश मान्टे यांच्या मुलाचा वाशिम येथील विवाह सोहळा आटोपून रात्रीला काही लोक वाहनाने (एमएच 28 एझेड 7546) देऊळगाव राजा शहराकडे परतीच्या प्रवासाला निघाले होते. दरम्यान फर्दापूरच्या चैनैल क्र. 283 जवळ लघूशंकेसाठी वाहन थांबवून ओम मांटे, विजय मांटे, तुषार मांटे हे तिघेजण लघूशंका आटोपून वाहनाजवळ आले. यावेळी पाठीमागून भरधाव आलेल्या सिमेंट मिक्सरच्या ट्रकने या तिघांना उडवले. ट्रकच्या पुढील चाकाखाली दबल्याने विजय मांटे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या ओम मांटे व तुषार मांटे या दोघांचा रुग्णालयात नेताना वाटेत मृत्यू झाला. फर्दापूर पोलीस पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा 

Back to top button