बुलढाणा: शाळकरी मुलीचे फोटो व्हायरल केल्याप्रकरणी तीन युवकांना अटक | पुढारी

बुलढाणा: शाळकरी मुलीचे फोटो व्हायरल केल्याप्रकरणी तीन युवकांना अटक

बुलढाणा; पुढारी वृत्तसेवा: निवासी शाळेत शिकत असलेल्या शाळकरी मुलीचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल केल्याप्रकरणी बुलढाणा पोलीसांनी तीन संशयित आरोपी युवकांना अटक केली आहे. याबाबत किन्होळा येथील एका रहिवासी व्यक्तीने सोमवारी (दि.१५) सायबर पोलीस स्टेशन बुलढाणा येथे तक्रार दिली होती. यानुसार कारवाई करत संबंधित तिनही युवकांवर IT Act अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना सायबर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

तक्रारदाराने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, संबंधित पीडित मुलगी निवासी शाळेत शिक्षण घेत होती. दरम्यान सागर हरिसिंग शिंगणे या युवकासोबत तिने तिचे फोटो काढले होते. हे फोटो तिचा नातेवाईक संतोष हिरालाल माळी (रा. माळवंडी) याने मिळवले. त्याचा वर्गमित्र शाहरुखशहा गुलजारशहा याच्या मदतीने हे फोटो मोबाईलवर घेतले. यानंतर पीडित मुलगी आणि सागर हरिसिंग शिंगणे या दोघांचे फोटो मुलीच्या नातेवाईकांच्या व्हॉट्सअॅपवर टाकून व्हायरल करण्यात आले, अशी तक्रार नोंदवण्यात आली आहे. या तक्रारीवरून संबंधित तिनही युवकांवर बुलढाणा येथील सायबर पोलीस स्टेशनमध्ये अप.क्र.25/2023 कलम 500 भा.दं.वि.सहकलम 66 (क) IT Act अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायबर पोलीसांनी याप्रकरणात तपास सुरू केला आहे. ज्या मोबाईल क्रमांकावरुन पिडीतेचे फोटो तिच्या नातेवाईकांमध्ये व्हायरल केले त्याचा तांत्रिक पध्दतीने तपास केला जात आहे. याप्रकरणात सायबर पोलिसांना यामधील तीनही संशयित आरोपी युवकांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान त्यांच्याकडुन याप्रकरणात वापरण्यात आलेला मोबाईल हँडसेट पोलीसांकडून जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती सायबर पोलिसांनी दिली आहे.

Back to top button