चंद्रपूर : दरोडेखोरांनी दोन शेतकऱ्यांची हत्या करून मंदिरातील दानपेटी पळवली | पुढारी

चंद्रपूर : दरोडेखोरांनी दोन शेतकऱ्यांची हत्या करून मंदिरातील दानपेटी पळवली

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : शेतालगतच्या मंदिरात झोपलेल्या दोन शेतकऱ्यांची दरोडेखोरांनी हत्या करून मंदिरातील दानपेटी लंपास केल्याची खळबजनक घटना आज गुरुवारी (दि.२३) सकाळी उघडकीस आली. भद्रावती तालुक्यातील मांगली शेतशिवारात ही घटना घडली. मधुकर खुजे (वय ७०) व बाबुराव खारकर (वय ६०), रा. मांगली, अशी मृत शेतकऱ्यांची नावे आहेत.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मांगली गावापासून काही अंतरावर जगन्नाथ बाबा मंदिर आहे. या मंदिराला लागूनच मधुकर आणि बाबुराव यांचे शेतजमीन आहे. शेताची राखण करण्यासाठी दोन्ही शेतकरी रोज जात होते. रात्री तेथील मंदिरात झोपत होते. बुधवारी रात्री अज्ञात दरोडेखोरांनी या दोन्ही शेतकऱ्यांवर हल्ला चढवून जागीच ठार केले आणि मंदिरातील दानपेटी घेऊन पोबारा केला. ही दान पेटी फोडलेल्या अवस्थेत मंदिरापासून काही अंतरावर आढळून आली. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी मंदिराकडे धाव घेतली. याप्रकरणी भद्रावती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिस अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी श्वान पथकालाही पाचारण केले आहे.

हेही वाचा : 

Back to top button