महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जतन व्हावे : आ. संग्राम जगताप | पुढारी

महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जतन व्हावे : आ. संग्राम जगताप

नगर; पुढारी वृत्तसेवा : मराठी नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडवा सणापासून सुरू होते. यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ गुढी उभारून नगर शहराचे विकासाचे पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे. सर्वांना बरोबर घेऊन शहर विकासाची गुढी आपण सर्वजण मिळून उभारू. सुसंस्कृत युवा पिढी निर्माण करण्यासाठी आपले सण-उत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

गुढीपाडवा सणानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आमदार संग्राम जगताप यांनी गुढी उभारली. यावेळी शिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष देविदास मुदगल, अंकुश चत्तर, महादेव कराळे, पिंटू पठाडे, गोरक्षनाथ सोनावणे, राहुल म्हसे, गणेश लाटणे आदी उपस्थित होते. आमदार जगताप म्हणाले, महाराष्ट्राला खूप मोठा ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. त्याचे जतन होण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन मोठ्या उत्साहात सण साजरे करावे. या महान संस्कृतीची प्रेरणा आजच्या युवा पिढीला होणे गरजेचे आहे.

Back to top button