चंद्रपूरात जिल्हा शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा बेमुदत संप | पुढारी

चंद्रपूरात जिल्हा शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा बेमुदत संप

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : निवासी डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या विरोधात तसेच सतत मिळत असलेल्या जीवघेण्या धमक्यांच्या विरोधात चंद्रपुरात निवासी डॉक्टरांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात आजपासून (गुरुवार दि.२) बेमुदत संप पुकारला आहे. काही महिन्यांपूर्वी एका रुग्णांवर उपचार जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरू होते. सदर रुगांचे नातेवाईक नेहमीच धमकावून डॉक्टरांकडून रुग्णाचे उपचार करून घ्यायचे. सदर रुगाचा मृत्यू झाल्यानंतर १ फेब्रुवारी ला रुग्णाच्या नातेवाईकांनी कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांना मारहाण केली. तसेच त्यांच्या निवासस्थानापर्यंत पाठलाग केला. या मारहाणीचा निषेध करण्यासाठी तसेच कॉलेज मधील आपातकालीन यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी गुरवार पासून निवासी डॉक्टरांनी बेमुदत संप पुकारला आहे.

यामध्ये प्रामुख्याने इतर वैद्यकीय महाविद्यालयाप्रमाणे सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवणे, आपतकालीन विभागातील सायरन दुरुस्त करणे, बंद पडलेले इंटरकोम दुरुस्त करणे, रुग्णालयाच्या आवारात वेळवेळी पेट्रोलिंग करणे, डॉक्टरांच्या निवासस्थानी रस्त्यांचे विद्युतीकरण करणे, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी पास सिस्टीम सुरू करणे, सर्व निकामी सीसीटीव्ही सिस्टिम पुन्हा सुरू करणे या मागण्यांचा समावेश आहे.

यावेळी मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर तेजस्विनी चौधरी, उपाध्यक्ष रोहित होरे, महासचिव डॉ. प्रशांत मगडुम, डॉक्टर ऋतुजा गंगरडे, डॉ. प्रियंका तलरेजा, डॉ. मंगल पाटील, डॉ. वृषभ जाधव, डॉ. सलेशा एन., डॉ.सुमेधा मेहानी, डॉ. सौरभ माने, डॉ. विष्णू एस, डॉ. नाहीद सय्यद, डॉ. मृणाल निखाडे, डॉ. शरद बुरुंगले, डॉ. अक्षय वाघमारे, सेवादल महिला काँग्रेस च्या अध्यक्ष लता बारापात्रे, काँग्रेस चे सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष मुन्ना तावाडे यांची उपस्थिती होती.

हेही वाचलंत का?

Back to top button