The Kapil Sharma : कृष्णा अभिषेकनंतर 'हा' कॉमेडियन शो सोडण्याच्या तयारीत? | पुढारी

The Kapil Sharma : कृष्णा अभिषेकनंतर 'हा' कॉमेडियन शो सोडण्याच्या तयारीत?

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील कॉमेडियन कपिल शर्मा ‘द कपिल शर्मा’ ( The Kapil Sharma ) शोच्या माध्यमातून चाहत्यांना खळखळून हसवत असतो. आता या शो विषयी एक नवी अपडेट समोर आलीय. या शोमधील सर्वच कलाकारांचा अभिनय कौतुकास पात्र असून चाहत्यांनी त्यांना नेहमीच दाद दिली आहे. गेल्या ६ वर्षाच्या प्रदीर्घ काळात ‘द कपिल शर्मा’ शोने चाहत्यांना वेगळी भूरळ घातली आहे. यामध्ये एकापेक्षा एक स्टार्सच्या अभियासासोबत मनोरंजनाचा तडका पाहायला मिळालाय. परंतु, काहीतरी बिनसलं आणि मध्यंतरी या शोमधून विनोदी अभिनेता कृष्णा अभिषेक बाहेर पडला. यानंतर त्याच्या चाहत्यांची निराशा झाली. आता आणखी एक कॉमोडियन किरकोळ कारणासाठी शोतून बाहेर पडण्याची तयारीत असल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे.

मिळालेल्या रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, गेल्या सात वर्षांपासून ‘द कपिल शर्मा शो’ ( The Kapil Sharma ) मधून चाहत्याचे मनोरंजन करणारा कॉमेडियन सिद्धार्थ सागर याने हा शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याआधीही कृष्णा अभिषेक, चंदन प्रभाकर यांनी कपिल शर्मा आणि निर्मात्यांसोबत काही किरकोळ कारणांमुळे शोतून बाहेर पडले होते. आता सिद्धार्थ सागरने हा निर्णय घेतल्याने निर्मात्यांनी चिंता वाढली आहे.

सागरने त्याच्या मानधनामध्ये वाढ करण्याची मागणी केली होती. मात्र, निर्मात्यांनी योग्य दखल घेतली नाही. यामुळे तो शोमधून बाहेर पडण्याच्या तयारीला लागला आहे. याच दरम्यान सिद्धार्थ मुंबईहून त्याच्या घरी म्हणजे, दिल्लीला परतला आहे. आता तो पुन्हा शोच्या शूटिंगला येणार की नाही? यांची शंका उपस्थित होत आहे.

सिद्धार्थने शोमध्ये ‘सेल्फी मौसी’, ‘उस्ताद घर छोड दास’, ‘फनवीर सिंग’ आणि ‘सागर पगलेतू’ यांसारख्या वेगवेगळ्या भूमिका साकारून चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. यानंतर या वृत्तानंतर चाहत्यांची मात्र, निराशा झाली आहे. यादरम्यान सिद्धार्थने कोणतीही अधिकृत्त माहिती दिलेली नाही. सिद्धार्थच्या आधी कृष्णा अभिषेक, चंदन प्रभाकर यांनीदेखील किरकोळ कारणांनी शोला रामराम ठोकला होता.

हेही वाचा : 

Back to top button