Nawazuddin Siddiqui : खायला अन्न आणि झोपायला जागा नाही; नवाजुद्दीनच्या पत्नीवर सासरचा जाच | पुढारी

Nawazuddin Siddiqui : खायला अन्न आणि झोपायला जागा नाही; नवाजुद्दीनच्या पत्नीवर सासरचा जाच

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) त्याच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. नवाजुद्दीनची पत्नी आलियावर सासरच्या घरात अत्याचार होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात तिने सासरचे लोक झोपायला जागा आणि खायला अन्न देत नसल्याचे म्हटलं आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाल्याने चर्चेत आला आहे. यानंतर चाहत्यांनी अनेक तर्क- वितर्क लावले आहेत.

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची (Nawazuddin Siddiqui) पत्नी आलिया सिद्दीकीने दोन दिवसांपूर्वी तिच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तिने स्वत: सह मुलांवर सासरचे लोक अत्याचार करत असून खायला देत नसल्याचे म्हटलं आहे. अलियाने घरातील दोन सोफ्याना जोडून तिची मुले झोपलेली असताना दाखविली आहे.

यावेळी तिने बाथरूम नाही, जेवायला अन्न नाही, झोपायला जागा नाही, बॉडीगार्डनी आमच्यावर नजर ठेवली आहे, आमच्या रूमला कुलूप लावण्यात आले आहे. गेल्या सात दिवसांपासून असा अत्याचार सुरू आहे. वडिलांना भेटू दिले जात नाही. पाहुण्यासाठी बनविलेल्या हॉलमध्ये राहत आहोत, यासारख्या अनेक गोष्टीचा नवाजुद्दीनच्या पत्नीने खुलासा केला आहे.

व्हिडिओच्या कॅप्शनमधून तिने ‘I have been forced to live, sleep and utilise only the hall, at my own husband’s house, since past 7 days. My children who have just arrived from Dubai are sleeping with me by joining two sofa sets in the Hall. I some how managed to take bath in a small toilet meant for guests. No food, no sleep and on top of that Security Guards are put all around me. Now, even cameras are installed and every move is monitored. No peace and no privacy. All seven bedrooms are locked by my inlaws, and my husband Nawazuddin Siddiqui is not traceable to protect me or even stand up for me. Even my Advocate was not being allowed to take my signature for Court papers. Will the harassment by my in-laws ever end.Waiting for justice. असे लिहिले आहे. यावरून नवाजुद्दीनची पत्नी आलियावर सासरी अत्याचार होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

नवाजुद्दीन आणि आलिया उर्फ ​​अंजना किशोर पांडे यांना ‘शोरा’ आणि ‘यानी’ अशी दोन मुले आहेत. आलियाने १९ मे २०२० रोजी नवाजुद्दीनपासून घटस्फोट घेत असल्याची माहिती एका मुलाखतीत दिली होती. यानंतर दोघांच्यात दुरावा निर्माण झाला आणि एकमेंकावर गंभीर आरोप केले जावू लागले. यादरम्यान मात्र, नवाजुद्दीन किंवा कुटूंबियांनी कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Aaliya Siddiqui (@aaliyanawazuddin)

 

View this post on Instagram

 

A post shared by Aaliya Siddiqui (@aaliyanawazuddin)

Back to top button