नागपुरात सोलर इंडस्ट्रीजवर सायबर ॲटॅक, सीबीआय तपास करणार | पुढारी

नागपुरात सोलर इंडस्ट्रीजवर सायबर ॲटॅक, सीबीआय तपास करणार

नागपूर : पुढारी वृत्तसेवा – भारतीय सैन्यदलासह इतर महत्त्वाच्या कंपन्यांना स्फोटके पुरवठा करणाऱ्या नागपूर जिल्ह्यातील सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडच्या रेकॉर्डमधील महत्त्वाचा डाटा सायबर हल्ल्याद्वारे चोरीला गेल्याची माहिती उघड झाल्याने खळबळ माजली आहे. या घटनेचा तपास सीबीआयकडे देण्यात येत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

नागपूर अमरावती मार्गावरील कोंढालीजवळ असलेल्या या सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड मधील ही घटना असल्याचे बोलले जाते. प्रसिद्ध उद्योगपती सत्यनारायण नुवाल यांची ही कंपनी असून सुरक्षाविषयकदृष्ट्या ही कंपनी महत्वाची मानली जाते. देशात विविध ठिकाणी वापरल्या गेलेल्या स्फोटकांच्या तपासावरून ही कंपनी चर्चेत आली आहे.

२१ जानेवारीच्या सुमारास ब्लॅक कॅट नामक हॅकर ग्रुपने अतिशय महत्त्वाचा संवेदनशील असलेला डाटा चोरल्याची माहिती या निमित्ताने उघड झाली आहे . दरम्यान, देशाच्या सुरक्षेच्यादृष्टीने संवेदनशील विषय असल्याने शहर किंवा ग्रामीण पोलीस यासंदर्भात तूर्त काहीही बोलण्यास तयार नाहीत.

Back to top button