Maharashtra Winter Session : नागपुरातील अधिवेशनात निम्म्यापेक्षा जास्त आमदार, कर्मचारी, पत्रकार सर्दी, खोकल्याने बेजार …! | पुढारी

Maharashtra Winter Session : नागपुरातील अधिवेशनात निम्म्यापेक्षा जास्त आमदार, कर्मचारी, पत्रकार सर्दी, खोकल्याने बेजार ...!

नागपूर; पुढारी वार्ताहर : नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि नागपूरसह विदर्भात सध्या कडाक्याची थंडी आहे. पारा १४ अंशावर घसरला आहे. एकीकडे कोरोनाचे संकट पुन्हा घोंगावत असताना अधिवेशनात बहुतांशी आमदार, अधिकारी, कर्मचारी इतकेच नव्हे तर पत्रकारदेखील सर्दी, खोकल्याने बेजार झाले आहेत. Maharashtra Winter Session

आज विरोधकांचा कामकाजावर बहिष्कार आणि मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे शोकप्रस्तावानंतर कामकाज स्थगित झाले. सोमवारपर्यंत आता वेळ असल्याने अनेकजण बाहेर रवाना होण्याच्या तयारीत दिसले. अधिवेशनाचा पहिला आठवडा आज संपला आहे. गेल्या चार दिवसांत निम्म्या आमदारांना सर्दी आणि खोकला झालेला असून हजारावर लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. सर्दी, खोकल्यासह काही आमदारांना तापसुद्धा आलेला आहे, तर काहींना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाची समस्या आहे. Nagpur Winter Session

कडाक्याच्या थंडीत दोन्ही सभागृहाचे वातावरण सीमावाद, भूखंड घोटाळा आदी विषयांवरून तापले आहे. नागपुरात किमान तापमान १४ अंश सेल्सिअसच्या जवळपास असून अनेकांना इतक्या थंडीची सवय नाही. त्यामध्येच गेले तीन दिवस सकाळी ९ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत कामकाज चालत आहे. त्यामुळे सकाळी ८.३० वाजतापासूनच आमदारांसोबत सर्वांना विधानभवन कडे हजेरी लावावी लागते आहे. येथे कोरोनाची तपासणी करण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या केंद्रावर आमदारांसह अधिकारी, कर्मचारीसुद्धा तपासण्या करताना दिसत आहेत. काल (दि.२२) सभागृहात कोरोनाचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर तपासणी करून घेण्याकडे सर्व जण जातीने लक्ष देताना दिसले. Maharashtra Winter Session

हे वाचलंत का?

Back to top button