नागपूर ; पुढारी वृत्तसेवा : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नाशिकच्या आमदार सरोज अहिरे-वाघ या आपल्या अडीच महिन्यांच्या चिमुकल्या बाळासह विधान भवनात पोहोचल्याने लक्षवेधी ठरल्या. मी आई आहे, सोबत आमदारही आहे, त्यामुळे दोन्ही कर्तव्ये महत्वाची आहेत. हे बाळ माझ्याशिवाय राहू शकत नाही, सोबत मतदारसंघातील लोकांचे प्रश्नही महत्वाचे आहेत, त्यामुळे बाळाला घेऊन यावे लागले अशी भावना अहिरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
प्रशंसक प्रवीण वाघ असे बाळाचे नाव आहे. ३० सप्टेंबरला त्याचा जन्म झाला त्यानंतर प्रथमच अधिवेशन असल्याने त्या बाळ व पती प्रवीण वाघ आणि अन्य कुटुंबीयांसह विधानभवनात पोहोचल्या. कुटुंबीय बाळाला सांभाळतील त्याचवेळी मी सभागृहात मतदारसंघातील प्रश्न मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा :