चंद्रपूरात अट्टल मोटारसायकल चोर अटकेत | पुढारी

चंद्रपूरात अट्टल मोटारसायकल चोर अटकेत

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर शहरात मागील काही महिन्यांपासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाली आहे. मोटारसायकलची चोरी करणा-या एका अट्टल चोराला शहर गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. शहरातील विविध ठिकाणांवरुन,  मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाली होती. त्यामुळे दुचाकीस्वारांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

रोज तक्रारी येत असल्याने पोलिसांनी दुचाकी चोरट्यांविरुद्ध मोहीम तीव्र करून चोरट्यांच्या मुसक्या आवळणे सुरू केले आहे. गुरुवारी (दि.१२) शहर गुन्हे शोध पथकाने अट्टल दुचाकी चोरटा अजय उर्फ भूषण शालीग्राम याला महाकाली मंदिर परिसरातून अटक केली. त्याच्याकडून दुचाकी चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आले असून, विविध ठिकाणाहून चोरलेल्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या. ही कारवाई ठाणेदार अंभोरे यांच्या मार्गदर्शनात शरीफ शेख, महेंद्र बेसरकर, विलास निकोडे, जयंता चुनारकर, चेतन गज्जलवार, सचिन बोरकर, इम्रान खान, दिलीप कुसराम, ईशाद खान, रुपेश रणदिवे यांच्या पथकाने केली आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button