Hardeek -Akshaya Wedding : पाठकबाईंचं उद्याचं लग्न? नेल आर्टवरून दिली हिंट | पुढारी

Hardeek -Akshaya Wedding : पाठकबाईंचं उद्याचं लग्न? नेल आर्टवरून दिली हिंट

पुढारी ऑनलाईन डेस्क : तुझ्यात जीव रंगला फेम पाठकबाई आणि राणा दा यांच्या घरी सनई-चौघडे वाजणार आहेत. दोघांच्याही घरी लगीनघाई सुरू आहेत. तुझ्यात जीव रंगला या मालिकेत अभिनेत्री अक्षया देवधर हिने पाठकबाईंची भूमिका साकारली होती. तर हार्दिक जोशीने राणा दाची भूमिका साकारली होती. या मालिकेत एकमेकांचे असणारे पार्टनर आता रिअल लाईफमध्येही एकमेकांचे साथीदार बनणार आहेत. हार्दिक जोशीच्या घरी मेहंदी आणि हळदीचा सोहळा पार पडला आहे. (Hardeek -Akshaya Wedding) अक्षयाच्या घरीदेखील मेहंदी सोहळा पार पडला. आता तिने नेल आर्टचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या नेल आर्टमध्ये काहीतरी खास आहे, जाणून घ्या. (Hardeek -Akshaya Wedding)

अक्षयाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने नेल आर्ट केलेलं दिसतं. नखांना सुंदर नेलपेंट लावत असताना #अहा आणि 2.12.2022 असे नखांवर लिहिलेले दिसते. यावरून दोघे उद्याच लग्नगाठ बांधतील, असा अंदाज लावता येईल. तिने या व्हिडिओला Super cute customised nails for my big day अशी कॅप्शनदेखील लिहिलेली दिसते.

याआधी तिने मेहंदीचे फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केले होते. तिने काही फोटोंना कॅप्शन लिहिली होती की- Colourful 🌈 & Most Comfortable Outfit for Mehendi was a Must for me. & All thanks to @labelsonalesawant for this fab outfit & @stylist.chaitalikulkarni for styling it. ❤️ #अहा मेहेंदी ✨🌸

तिने मेकअप करतानाचाही व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये तिचा लिप मेकअप आणि आय मेकअप करताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

 

View this post on Instagram

 

A post shared by Komal Shete | Artist (@shetekomal_)

Back to top button