Suryakumar Yadav and ODIs : सूर्यकुमार यादव वनडेमध्‍ये अपयशी का ठरतो? माजी क्रिकेटपटूने दिले उत्तर | पुढारी

Suryakumar Yadav and ODIs : सूर्यकुमार यादव वनडेमध्‍ये अपयशी का ठरतो? माजी क्रिकेटपटूने दिले उत्तर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : नुकत्‍याच झालेल्‍या टी-२० विश्‍वचषक आणि त्‍यानंतरच्‍या न्‍यूझीलंड दौर्‍यातील टी-२० मालिकेत भारताचा स्‍टार फलंदाज सूर्यकुमार यादवची फलंदाजी स्‍मरणीय ठरली. मात्र न्‍यूझीलंड विरुद्घच्‍या वन डे मालिकेत सूर्यकुमार अपयशी ठरली. टी-२०मध्‍ये दमदार फलंदाजी करणार सूर्यकुमार वनडेमध्‍ये अपयशी कसा ठरतो, असा प्रश्‍न क्रिकेटप्रेमींनाही पडला आहे. या प्रश्‍नाचे उत्तर टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वासीम जाफर याने दिले आहे. ( Suryakumar Yadav and ODIs )

न्‍यूझीलंड विरुद्‍ध झालेल्‍या वनडे मालिकेत सूर्यकुमार याने तीन सामन्‍यात २२च्‍या सरासरी आणि ११५.७९ स्‍ट्राइक रेटने केवळ ४४ धावा केल्‍या. या मालिकेतील पहिल्‍या अणि तिसर्‍या सामन्‍यात तो अनुक्रमे ४ आणि सहा धावांवर बाद झाला. तर दुसर्‍या सामन्‍यात त्‍याने ३४ धावांची खेळी केली होती.

Suryakumar Yadav and ODIs : टी-२० मध्ये स्‍लिपमध्‍ये फिल्डर नसतो

सूर्यकुमार वन डेमध्‍ये अपयशी का ठरतो, या प्रश्‍नाचे उत्तर देताना वासीम जाफर म्‍हणाला की, न्‍यूझीलंड विरुद्धच्‍या दोन वनडे सामन्‍यात सूर्यकुमार यादव एकाच प्रकार बाद झाला. या दोन्‍ही सामन्‍यांमध्ये तो स्‍लीपमध्‍ये झेलबाद झाला. टी-२० क्रिकेटमध्‍ये क्षेत्ररक्षणात स्‍लिपमध्‍ये स्‍लिपमध्‍ये फिल्डर नसतो. त्‍यामुळे टी-२०मध्‍ये तुमचा बचाव होतो. मात्र जेव्‍हा तुम्‍ही संपूर्ण करिअरचा विचार करता तेव्‍हा चर्चा होते की तुम्‍ही कसोटी क्रिकेट कसे खेळणार? त्‍यामुळे सूर्यकुमार याला आपल्‍या खेळात आणखी प्रावीण्‍य आणण्‍याची गरज आहे, असा सल्‍लाही वसीमने दिला आहे.

यंदाचे वर्ष राहिले सूर्यकुमारच्‍या नावावर

टी-२० क्रिकेटमध्‍ये यंदाचे वर्ष सूर्यकुमारच्‍या नावावर राहिले आहे. या वर्षी त्‍याने अनेक विक्रम केले. यावर्षी सर्वाधिक धावा करणारा तो खेळाडू झाला आहे. त्‍याने ३१ डावांमध्‍ये ४६.४७ च्‍या सरासरी आणि १८७.४३ च्‍या स्‍ट्राइक रेटने १ हजार १६४ धावा केल्‍या आहेत. यामध्‍ये दोन शतके आणि ९ अर्धशतकी खेळीचा समावेश आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button