Buldhana : धाड-माहोरा मार्गावरील अपघातात दीर-भावजय जागीच ठार; पती मुलगी जखमी | पुढारी

Buldhana : धाड-माहोरा मार्गावरील अपघातात दीर-भावजय जागीच ठार; पती मुलगी जखमी

बुलढाणा; पुढारी वृत्तसेवा : गाडीवरचा ताबा सुटल्याने धाड-माहोरा मार्गावर झालेल्या अपघातात दोघाजणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. धोकादायक वळणावर लोखंडी कठड्याला धडकल्याने ही दुर्घटना घडली. रविवारी रात्री घडलेल्या या घटनेत कारचालक  दीरासह व त्याच्या भावजयीचा जागीच मृत्यू झाला. (Buldhana)

धाड माहोरा मार्गावर म्हसला-जांब गावादरम्यान एका अपघातप्रवण स्थळावर ही दुर्घटना घडली. जालना जिल्ह्यातील पाचनेर येथे माहेरी भाऊबीजसाठी गेलेली विवाहिता सुनिता ही पती, दीर व मुलगीसह सासरी देऊळघाटकडे परत निघालेली होती. दरम्यान त्यांच्या कारचा अपघात झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (Buldhana)

आकाश प्रकाश पन्हाळे (२४) व सुनिता संतोष पन्हाळे (३६) अशी मृतांची नावे आहेत. या दुर्घटनेतील महिलेचा पती संतोष पन्हाळे व त्यांची मुलगी पूजा गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा

Back to top button