अकोला: दोन मिनिटात सात वार; पूर्ववैमनस्यातून एकाची हत्या!

File Photo
File Photo

अकोला, पुढारी वृत्तसेवा : उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतील उपशहर प्रमुखाची हत्या पूर्व वैमानस्यातूनच झाल्‍याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी अवघ्या दोन तासातच प्रकरणाचा छडा लावून दोन आरोपींना कारंजा येथून अटक केली. आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास शहरातील जठारपेठ भागातील गणेश स्विट मार्टसमोर भर चौकात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतील उपशहर प्रमुख विशाल रमेश कपले यांच्यावर दोन अज्ञात व्यक्‍तींनी दोन मिनिटात सात वार केले. आरोपींनी सात वार केल्याने विशालचा घटनास्थळीच मृत्यू झाला.  या घटनेनंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विशालला परिसरातील नागरिकांनी तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आरोपी अकोला शहरातील रहिवाशी असल्याचे पोलिसांनी कळताच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला. पोलीस पथकाने या हत्येतील आरोपींना दोन तासाच्या आत कारंजा येथून अटक केली.

दहा दिवसापूर्वी झाले होते भांडण

दहा दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी आरोपी 23 वर्षीय शिवानंद मनोहर दोरवेकर व 22 वर्षीय विनोद रमेश कांबळे दोघेही राहणार महाकाली मंदिर मोठी उमरी यांनी ही हत्या केल्याची कबुली दिली. आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news