भंडारा: शेती विकूनही कर्जबाजारी; शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल | पुढारी

भंडारा: शेती विकूनही कर्जबाजारी; शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

भंडारा: पुढारी वृत्तसेवा: थकीत कर्ज आणि नापिकीमुळे शेतकऱ्याने ग्रामपंचायतच्या विहिरीत उडी घेऊन जीवन संपवले. ही घटना भंडारा जिल्ह्यातील तिर्री-मिन्सी येथे मंगळवारी (दि. २५) घडली. राजेंद्र वासुदेव शांतलवार (वय ५५, रा. तिर्री- मिन्सी असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, शांतलवार यांच्यावर शेतीचे कर्ज होते. ते कर्ज फेडण्यासाठी त्यांनी २०२० मध्ये एकूण शेतीपैकी २ एकर शेती विकली होती. सध्या त्यांच्याकडे १ एकर शेती होती. मागील वर्षी शेती कसण्याकरीता त्यांनी सोसायटीमधून उर्च उचलले होते; पण ते कर्ज थकीत राहिले. तसेच यावर्षी शेतीतून उत्पन्न मिळाले नाही. नापिकी आणि कर्जामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. याप्रकरणी अड्याळ पोलिसांनी नोंद केली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button