अकोलाः कावडयात्रेत मोठ्या आवाजात डीजे वाजवल्याने गुन्हा दाखल | पुढारी

अकोलाः कावडयात्रेत मोठ्या आवाजात डीजे वाजवल्याने गुन्हा दाखल

अकोलाः पुढारी वृत्तसेवा : कावड पालखी उत्सवादरम्यान मोठ्या आवाजात डीजे वाजवणाऱ्या एका डीजेवर पोलिसांनी कारवाई करीत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांचे प्रदूषण नियंत्रण पथक कावड पालखी उत्सवादरम्यान सक्रीय होते. जुने शहर पोलिस आणि पथकाचे कर्मचारी हे जय हिंद चौकातून कोतवाली चौकादरम्यान गस्तीवर असताना त्यांना युवा स्वाभिमान पार्टी नाव लिहिलेल्या मंडप टेन्टमध्ये असलेल्या डीजेचा आवाज मोठा येत होता. त्यांनी सुमीत देवकिसन पाखरे (रा. डाबकी रोड) याच्यावर कारवाई केली.

शासनाने निर्धारित केलेल्या ५५ डेसिबल पेक्षा जास्त आवाजात डीजे वाजवणे हा कायद्याने गुन्हा असल्याने पोलिसांनी सुमीत देवकिसन पाखरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. डीजेवरील ही पहिलीच कारवाई ठरली. जय हिंद चौकातून कोतवाली चौकादरम्यान पीएसआय रितेश देशमुख यांच्या तक्रारीवरून जुने शहर व ध्वनी प्रदूषण नियंत्रण पथकाने पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सेवानंद वानखडे यांनी ही कारवाई केली.

Back to top button