नेचर इन नीडचे अपील न्यायालयाने फेटाळले

नेचर इन नीड
नेचर इन नीड

कोल्हापूर ः पुढारी वृत्तसेवा नेचर इन निड सर्व्हिसेस या संस्थेने महापालिकेविरुद्ध केलेले अपील जिल्हा न्यायालयाने फेटाळले. तत्कालीन आयुक्तांनी महापालिका कायद्यानुसार नेचर इन निड या संस्थेने करारातील अटी व शर्तीचा भंग केल्याने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. सातारा येथील नेचर इन निड संस्थेला शहरातील जैव वैद्यकीय कचरा संकलन, वाहतूक व विल्हेवाट प्रकल्प उभारण्यासाठी कसबा बावडा येथील दहा चौ. फूट जागा भाडे कराराने 2011 मध्ये दिली होती.

तत्कालीन आयुक्तांनी संस्थेने करारातील अटी व शर्तींचा भंग केल्याने व रॉयल्टी 53,67,000 रु. थकीत असल्याने संस्थेवर कारवाई केली होती. या कारवाईत प्रकल्पातून बेदखल केले होते. आयुक्तांच्या या आदेशाविरुद्ध नेचर इन निड संस्थेने जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले होते. महापालिकेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news