Vidarbh : विदर्भात मुसळधार पावसाचा तडाखा; वीज पडून तीघे जण ठार | पुढारी

Vidarbh : विदर्भात मुसळधार पावसाचा तडाखा; वीज पडून तीघे जण ठार

नागपुर; पुढारी वृत्तसेवा : विदर्भात मुसळधार पावसाचा धडाखा सुरूच आहे. मान्सून सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत अनेकांना पावसाळी दुर्घटनांमध्ये आपला जीव गमवावा लागला आहे. अशाच दुर्दैवी दुर्घटना यवतमाळ, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात घडल्या आहेत. नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात वीज कोसळून वेगवेगळ्या घटनेत तिघांचा मृत्यू झाला तर यवतमाळ येथे वीज कोसळून झाडाखाली असलेल्या २४ शेळ्या व एक कुत्रा ठार झाल्याची घटना घडली आहे.

नागपूर, चंद्रपूर येथे वीज कोसळून तिघांचा मृत्यू

नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात वीज कोसळून वेगवेगळ्या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. भद्रावती तालुक्यातील चिचोर्डी परिसरात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर याच घटनेत अन्य एकजण जखमी झाला आहे. भद्रावती तालुक्यातील चिचोर्डी परिसरात एका शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर याच घटनेत अन्य एकजण जखमी झाला आहे. दुसऱ्या घटनेत जीवती तालुक्यात शेडवाही शिवारात वीज कोसळून एका शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर नागपूर जिल्ह्यातील हिंगणा पोलीस हद्दीत वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. उज्वला थुटूरकर असे या महिलेचे नाव आहे. यंदा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

भद्रावती तालुक्यातील शहरालगत असलेल्या चिचोर्डी शेत शिवारात पाळीव जनावरे चारत असलेल्या शेतकऱ्यावर वीज कोसळल्याने त्याचा जागीचा मृत्यू झाला. तर या घटनेत आणखी एक जण जखमी झाला आहे. संजय काशिनाथ चालखुरे (वय ५५) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे तर वीज पडल्यामुळे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव विकास डाखरे (वय २२) असे आहे. हे दोघेही चीचोर्डी शेत शिवारामध्ये गुरे चारत होते. याचवेळी जोरदार पावसाला सुरुवात झाली. यातच अंगावर वीज कोसळल्याने संजय चालखुरे यांचा मृत्यू झाला. तर विकास डाखरे हा तरुण जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

यवतमाळ वीज कोसळून २४ शेळ्या ठार

यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुक्यातील मांडवी जंगलालगत असलेल्या जुनोनी शिवारात शनिवारी दुपारी वीज कोसळून २४ शेळ्या ठार झाल्या. सकाळपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. विजेचा कडकडाट सुरू होता. गुराखी बंडू कुमरे व हनुमंत चुकाबाेटलावार हे दोघे नेहमीप्रमाणे शेळ्या घेऊन शेतशिवारात गेले होते. पावसाला सुरुवात होताच सर्व शेळ्या झाडाखाली थांबल्या. नेमकी त्याच वेळी त्या झाडावर वीज कोसळली. शेळ्यांच्या कळपावर वीज पडल्याने सर्व शेळ्या व एक कुत्रा जागीच ठार झाला.

हेही वाचा

Back to top button