औरंगाबाद-नागपूर महामार्गावर दोन ट्रकची समोरासमोर धडक, तीन ठार | पुढारी

औरंगाबाद-नागपूर महामार्गावर दोन ट्रकची समोरासमोर धडक, तीन ठार

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : औरंगाबाद महामार्गावर नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिंगणापूर फाट्यावर दोन ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी आहे. गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. दोघांचे मृतदेह ट्रक मधून काढण्यात पोलिसांना यश आले असून एक व्यक्ती गंभीर आहे. त्यावर नांदगाव खंडेश्वर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे. किशोर मगना (वय २५ रा. दुडिया राजस्थान), प्रेमप्रकाश रुगाराम (30  रा. राजस्थान) ,सर्वेशकुमार झल्लासिग (35  रा. घनश्यामपूर उत्तर प्रदेश) अशी अपघात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

शिंगणापूर फाट्यावरून पाचशे मीटर अंतरावर (आर जे 04 जीसी 2258) क्रमांकाचा  ट्रक नागपूरकडून औरंगाबादकडे जात होता तर (सीजी 04 एच झेड 8154) क्रमांकाचा दुसरा ट्रक औरंगाबाद कडून नागपूरकडे जात होता. मात्र या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे असल्याने खड्डा वाचवण्याच्या प्रयत्नात दोन ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात झाला. यातील एका ट्रकमध्ये सळ्या तर दुसऱ्या ट्रकमध्ये कांदे होते. मात्र दोन्ही ट्रकची समोरासमोर भीषण धडक झाल्याने दोन ट्रक मधील दोघांचा अंगावरून आर-पार सळ्या गेल्या आहेत.  रात्री उशिरा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस रात्रीचं घटनास्थळी दाखल झाले. मात्र दोन्ही ट्रक रस्त्यावर आडवे झाल्याने या ठिकाणी सुमारे दहा ते वीस किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली होती. ही वाहतूक तब्बल तेरा तासानंतर सुरळीत करण्यात आली.

अमरावती महानगरपालिका यांच्याकडून अग्निशामक व जेसीबी याचे पाचारण करून ट्रकमध्ये फसलेल्या दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. १ व्यक्ती गंभीर जखमी असल्याने त्याच्यावर नांदगाव खंडेश्वर ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरू आहे. पोलिसांनी  शर्तीचे प्रयत्न केले व तब्बल १३ तासांनी अद्यापही मृत्यूदेह काढण्यात पोलिसांना यश आले नाही. घटनास्थळी वाहतूक सुरळीत करण्यासाठी नांदगाव खंडेश्वर, मंगरूळ चव्हाळा, बडनेरा व तळेगाव दशासर येथील पोलीस घटनास्थळी आहे. औरंगाबाद ते नागपूर या या महामार्गावर शिंगणापूर जवळ असलेल्या पुलावर खड्डा पडला व तो खड्डा वाचताना दोन्ही ट्रकचा अपघात झाला त्यामुळे या महामार्गावर असलेला खड्डा तातडीने बुजवावा अशी परिसरातून मागणी होत आहे.

नागपूर औरंगाबाद महामार्गावर झालेल्या अपघातात मृतकांचे शरीराची ओळख करून रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. त्याकरिता पोलीस प्रशासनाने युद्ध स्तरावर प्रयत्न केले व शिंगणापूर फाट्यावर गतिरोधक नसल्यामुळे अपघाताचे हे ठिकाण ठरत आहे
– API एस. ए. चव्हाण सपोनी नांदगाव खंडेश्वर

नागपूर औरंगाबाद या महामार्गाचे या रस्त्याचे दुरुस्तीचे काम पावसाळ्यामुळे रखडले होते करण्यात येईल याकरिता आमदार महोदयांनी निवेदन देऊन तातडीने काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे तेव्हा शिंगणापूर चौफुलीवर ब्रेकर व रस्त्याची दुरुस्ती तातडीने करण्यात येईल
– डॉ. अरविंद काळे प्रकल्प संचालक NHAI औरंगाबाद

Back to top button