ED action on WazirX : वजीरएक्स क्रिप्टोएक्सचेंजची मालमत्ता ईडीने गोठवली; मनीलाँड्रींगसाठी क्रिप्टोचा वापर

ED action on WazirX
ED action on WazirX
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क :  सक्त वसुली संचालनालयाने शुक्रवारी WazirX या क्रिप्टोकरन्सीची ६५ कोटींची मालमत्ता गोठवली आहे. WazirX ही कंपनी Zanmai Labs Private Limited या कंपनीकडून चालवली जाते. तर यासाठीची पायाभूत संरचना ही चीनमधील Binace कंपनीची आहे. ईडीने (ED) या कारवाईची माहिती ट्वीटरवर दिलेली आहे. (ED action on WazirX)

"ईडीने कर्ज देणाऱ्या मोबाईल अ‍ॅपची चौकशी सुरू केली आहे (ED action on WazirX). WazirX ही कंपनी अशा अ‍ॅपना मदत करत होती. ही कंपनी क्रिप्टोच्या माध्यामातून अशा अ‍ॅपना मनीलाँड्रिंगमध्ये मदत करत होती," असे ईडीने (ED) म्हटले आहे. ईडीने यापूर्वी ३ ऑगस्टला हैदराबादमध्ये या कंपनीची चौकशी केली होती, पण चौकशीत सहकार्य कंपनीने सहकार्य केले नाही," असे पीटीआय या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

सध्या ईडी तत्काळ कर्ज देणाऱ्या चिनी मोबाईल अ‍ॅपची चौकशी करत आहे. WazirX या कंपनीला यापूर्वी FEMAनुसार नोटीसही देण्यात आली आहे. WazirX चे संचालक समीर म्हात्रे कोणत्याही व्यवहारांची माहिती देत नाहीत, असे ईडीने म्हटले आहे. या दोन एक्सचेंजवर झालेले व्यवहार ब्लॉकचेनवर नोंदवलेले नाहीत, त्यामुळे हे सारेच व्यवसाय गूढ ठरले आहेत, अशी माहिती अर्थराज्य मंत्री पंकज चौधरी यांनी यापूर्वी संसदेत दिली होती.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news