अमरावती : क्रुझर गाडी खड्ड्यात कोसळून मजूर ठार; १७ जण जखमी | पुढारी

अमरावती : क्रुझर गाडी खड्ड्यात कोसळून मजूर ठार; १७ जण जखमी

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : क्रुझर गाडी अनियंत्रित होऊन खड्ड्यात कोसळल्याने एका मजुराचा मृत्यू झाला. तर १७ जण जखमी झाले. सुरेश हिरालाल जामुनकर (30, रा. गिरगुटी) असे मृताचे नाव आहे. ही घटना चिखलदरा तालुक्यातील टेंबुरसोडाजवळील वळणावर आज (दि. 27) जुलै सकाळी 8 च्या सुमारास घडली. या अपघातातील जखमींना उपचारासाठी टेबुरसोंडा येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मजुरांना घेऊन जाताना अपघात

चिखलदरा तालुक्यातील गिरगुटी व कुलंगना येथील काही मजूर एमएच 27 एससी 0357 या क्रमांकाच्या क्रुझर गाडीने चौरामल येथे शेतीच्या निदन कामासाठी जात होते. दरम्यान चिखलदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेबुरसोंडा पोस्ट बेसिक कन्या आश्रमशाळेजवळील वळणावर अचानक गाडीचा चालक ईश्वर धांडेकर (रा. अबांपाटी) याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात जाऊन कोसळली.

या अपघातात सुरेश जामुनकर याचा मृत्यू झाला. तर या अपघातात प्रिती लक्ष्मण बेलसरे (35, रा. कुलगंणा), पदमा किशन बेलसरे (19), बाबूलाल लक्ष्मण बेलसरे (28), सुकलाल लक्ष्मण बेलसरे (33), अनिता सुकलाल बेलसरे (23), ललिता रामराव कास्देकर (64, सर्व रा. वस्तापुर), अंजु संजु कास्देकर (23), संजय रामप्रसाद बेलसरे (17), शंकर गंगाराम कास्देकर (19), सुमदी साहु सावरकर (45), लक्ष्मी शिवलाल कास्देकर (40), सुनिता किसन कास्देकर (40), बेबी राजकुमार कास्देकर (23, सर्व रा. कुलगंणा) जखमी झाले. जखमींना प्रथम उपजिल्हा रुग्णालयात व त्यानंतर अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.

वाहनाच्या टपावर बसले होते मजूर

गाडीच्या टपावर आणि काही जण आत बसले होते. त्यामुळे वळण रस्त्यावर वाहन अनियंत्रित होऊन रस्त्याखाली उतरले आणि खड्ड्यात जाऊन कोसळले. यावरून दिसून येत आहे की, ग्रामीण भागात अतिक्षमतेची अवैध प्रवासी वाहतूक सर्रास सुरु आहे. त्यामुळे अशा अपघाताला आमंत्रण मिळाले आहे. यावर पोलीस यंत्रणा व आरटीओ कार्यालयाने लक्ष देण्याची गरज आहे.

चालक नशा करून चालवीत होता वाहन

या अपघातातील एक महिला गंभीर असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिली आहे. मजूर गाडीच्या आत, तर काही पुरुष गाडीच्या टपावर बसले होते. ज्यावेळी वाहन खड्ड्यात गेले. त्याचवेळी टपावर बसलेले मजूर आधी खाली कोसळले. आणि आतील मजूरदेखील एकमेकांच्या अंगावर जाऊन पडले. वाहनचालक हा नशा करून गाडी चालवीत होता, अशी माहिती एका जखमी महिला मजुराने दिली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button